'रॉकस्टार' हा रणबीर कपूरचा गाजलेला सिनेमा आठवतोय? यामध्ये नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) मुख्य अभिनेत्री होती. रणबीर आणि नर्गिसची केमिस्ट्री खूप गाजली. दरम्यान नर्गिस फाखरीने गुपचूप लग्न केल्याची माहिती मिळत आहे. अनेक वर्षांपासून ती टोनी बेगला डेट करत होती. त्याच्याशीच तिने लग्न केलं आहे अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. टोनी बेग तरी आहे तरी कोण?
नर्गिस फाखरीने अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथे लग्नगाठ बांधली आहे. तिचा नवरा टोनी बेग हा अमेरिकेत व्यावसायिक आहे. कॅलिफोर्नियाच्या लक्झरी बेव्हेर्ली हिल्स हॉटेलमध्ये त्यांनी गुपचूप लग्न केलं. अद्याप नर्गिसने तिच्या लग्नाची बातमी जाहीर केलेली नाही. रेडिट साईटवर त्यांच्यावेडिंग केकचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यावर 'हॅपी मॅरेज' असं लिहिलं आहे. गेल्या आठवड्यातच त्यांनी लग्न केलं असून सध्या दोघंही स्वित्झर्लंडमध्ये हनिमून एन्जॉय करत आहेत. नर्गिसने स्वित्झर्लंडमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Nargis Fakhri is married to her bf Tony Beigbyu/ExtraStudy1399 inBollyBlindsNGossip
नर्गिस आणि टोनी बेग २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनी आयुष्यभराची गाठ बांधली आहे. टोनी बेगचा जन्म काश्मीरमध्ये झाला. नंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. 'द डियोज ग्रुप' या क्लोदिंग मर्चंडाइज कंपनीचा तो संस्थापक आहे. २००६ मध्ये त्याने ही कंपनी सुरु केली.
नर्गिसचा जन्म अमेरिकेतच झाला आहे. तिने २०११ साली 'रॉकस्टार' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर ती वरुण धवनसोबत 'मै तेरा हिरो' मध्येही दिसली. याशिवाय 'अजहर','हाऊसफुल ३','मद्रास कॅफे','ढिशूम','स्पाय','फटा पोस्टर निकला हिरो' या सिनेमांमध्येही ती झळकली. २०२२ साली अनुपम खेर यांच्या 'शिव शास्त्री बाल्बोआ' सिनेमात ती शेवटी दिसली.