Join us

सेक्स करण्यासाठी नकार दिल्यामुळे, अभिनेत्री आजही बॉलिवूडपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 14:46 IST

2004 साली 'मर्डर' या सिनेमात बोल्ड भूमिका केल्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

स्वप्नांची नगरी... मायानगरी... मुंबई.... या दुनियेत स्वतःचं नाव आणि पैसा कमावण्याचं स्वप्न ऊराशी बाळगून अनेकजण मुंबईत येतात. मात्र इथं स्वतःची ओळख बनवणं तितकंच सोपं नसते. करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे.

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आणि ध्येयपूर्तीसाठी अनेक खडतर मार्ग त्यांना पार करावे लागतात. यातूनच कास्टिंग काऊच, बडे निर्माते-दिग्दर्शक किंवा दिग्गज कलाकारांकडून होणाऱ्या छळाचा सामना करत तडजोड करावी लागते. मल्लिका शेरावतनेही याच गोष्टीसाठी नकार दिल्यामुळे तिला  हातचे अनेक मोठे सिनेमे सोडावे लागले.  2004 साली 'मर्डर' या सिनेमात बोल्ड भूमिका केल्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक आपल्याकडून वैयक्तिक आयुष्यात याच गोष्टींची मागणी करायला लागले. ही तडजोड करायला नकार दिल्यानेच अनेक सिनेमे हातचे गेल्याची कबुली तिने दिली होती. 

कपिल शर्मा शोमध्ये मल्लिकाने एक अजब किस्सा सांगितला होता. एका चित्रपट निर्मात्याला हॉटनेस चेक करायचा होता आणि त्यासाठी तिच्या पोटावर अंडा फ्राय करायची ईच्छा होती. पण मल्लिकाने त्यासाठी नकार दिला. बघता- बघता ती कधी बॉलिवूडपासून दुरावली गेली तिलाच कळाले नाही.  गेल्या काही वर्षापासून मल्लिका बॉलिवूडपासून दूर आहे. 

टॅग्स :मल्लिका शेरावत