Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ मल्होत्राला डेट करतेय कियारा अडवाणी ?, अभिनेत्री म्हणाली- मी अजूनही सिंगल

By गीतांजली | Updated: October 23, 2020 13:06 IST

या दोघांनीही त्यांचे नाते अधिकृतपणे कधीच स्वीकारलेले नाही.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या अफेअरची अफवा सध्या जोरदार आहे. या दोघांनीही त्यांचे नाते अधिकृतपणे कधीच स्वीकारलेले नाही. 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कियाराला विचारण्यात आले की ती सिंगल आहे की नाही? कियारा यांनी या प्रश्नाचे उत्तर फिरावून दिले आणि तिने कोणत्याच अफवा फेटाळून देखील लावल्या नाहीत.

कियारा या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाली, "मी लग्न करेपर्यंत मी सिंगल आहे. मी अजून लग्न केलेले नाही, म्हणूनच मी सिंगल आहे."कियाराने रिलेशनशिपचा प्रश्न अतिशय मजेदार पद्धतीने टाळला.

कियारा आणि सिद्धार्थ लवकरच 'शेरशाह'सिनेमात एकत्र दिसणार आहे. कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. रिपोर्टनुसार सिनेमाचे शूटिंग आता लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राने त्याचे सीन्स शूट करण्याची सुरुवात केली आहे.  

सिद्धार्थने केले आहे कियाराचे कौतुक काही महिन्यांपूर्वी कियाराने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फॅन्ससोबत लाईव्ह सेशन केले होते. यादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राने या दरम्यान छोटीशी एंट्री घेतली होती. सिद्धार्थ कियाराचे कौतुक करताना म्हणाला होता की, ती खूप सुंदर दिसते आहे आणि तिला आपला 'मरजावां' सिनेमा पाहण्यास सांगितले आहे. कियाराने ही सिद्धार्थचे आभार मानले होते. 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा