Join us

'माझं लाल नाक दाखवण्यापेक्षा'; काजोलची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 13:45 IST

kajol: अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर करत तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. सोबतच तिला तिच्या लेकीची नासाची प्रचंड आठवण येतीये असंही म्हटलं आहे.

उत्तम अभिनयासोबतच आपल्या मस्तीखोर अंदाजामुळे चर्चेत येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे काजोल (kajol). कलाविश्वाप्रमाणेच काजोल सोशल मीडियावरही सक्रीय असते. यात अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर करत तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. सोबतच तिला तिच्या लेकीची नासाची प्रचंड आठवण येतीये असंही म्हटलं आहे.

काजोलने इन्स्टाग्रामवर न्यासाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये न्यासाची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण माझं लाल झालेलं नाक कोणालाही दाखवणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी जगातल्या सगळ्यात गोड हास्याला शेअर करत आहे. मिस यू न्यासा, असं कॅप्शन देत काजोलने तिला कोविड झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, काजोलची पोस्ट पाहिल्यानंतर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच न्यासाचा फोटो पाहून अनेकांनी तिचं कौतुकही केलं आहे. सध्या न्यासा सिंगापूरमध्ये तिचं पुढील शिक्षण घेत आहे.  

टॅग्स :काजोलसेलिब्रिटीबॉलिवूड