Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सिंघम' फेम काजल अग्रवाल बिझनेसमनसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत, काही दिवसांपूर्वी गुपचुप उरकला होता साखरपुडा

By गीतांजली | Updated: October 5, 2020 17:56 IST

काजल ब-याच दिवसांपासून गौतमला डेट करत असल्याचे मानले जात आहे.

कोरोना काळ्यात  सिनेमांचे शूटिंग तर थांबलेच पण सोबत सेलिब्रेटींची लग्नही अडकली.आता सिनेमांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तर सेलिब्रेटी लग्नाच्या तयारीला लागले आहेत. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सिंघम फेम काजल अग्रवाल लवकरच बिझनेसमन गौतम किचलूसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

काजल अग्रवालने गुपचूप उरकला होता साखरपुडारिपोर्टनुसार, काजल ब-याच दिवसांपासून गौतमला डेट करत असल्याचे मानले जात आहे. अर्थात अद्याप काजलने जाहीरपणे याची कबुली दिली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी काजलने गौतमसोबत गुपचूप सारख पुडा उरकल्याची चर्चा होती. गौतम इंटिरिअर डिझानर आहे. रिपोर्टनुसार काजल आणि गौतम मुंबईत धुमधडाक्यात लग्न करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस हा लग्नसोहळा चालणार आहे, लग्नाला काही खास मित्रांना आमंत्रण देण्यात येणार आहे. 

काजल साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपची अभिनेत्रींकाजल आणि गौतम यांच्या नात्याविषयी फारशी माहिती नाही परंतु असेही सांगितले जात आहे की तेथे अरेंज-लव्ह मॅरेज आहे. तिच्या वर्कफ्रंटबाबत सांंगायचे झाल्यास सध्या मोसागल्लू, आचार्य, मुंबई सागा, हे सिमिनिका असे सिनेमे काजल कडे आहेत.काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. मात्र काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

IN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

 

टॅग्स :काजल अग्रवाल