Join us

‘या’ अभिनेत्रीने चाहत्यांची इच्छा अशी केली पूर्ण, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 19:12 IST

अभिनेत्री अदा शर्मा हिला तिच्या हॉट अदांसाठी ओळखले जाते. चाहत्यांच्या इच्छेखातर तिने आपल्या अशाच काहीशा हॉट अदा दाखविल्या, पाहा व्हिडीओ!

अभिनेत्री अदा शर्मा हिचे बॉलिवूडमधील करिअर अडखळत असले तरी, सोशल मीडियावर मात्र ती सुसाट असल्याचे दिसून येत आहे. कारण ती वेळोवेळी सोशल मीडियावर आपले व्हिडीओ आणि फोटोज् अपलोड करून चाहत्यांना एकप्रकारची भेट देत असते. त्यामुळे तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्या तुफान आहे. अदाने ११ मे रोजी म्हणजेच तिच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अदा ज्यापद्धतीने आपल्या अदा दाखवित आहे, त्यावरून चाहते तिच्यावर कौतुकाचा अक्षरश: वर्षाव करीत आहेत. एक-एक ºिहदम पकडून अदा डान्स करताना दिसत आहे. अदाचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, त्यास मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे.  अदा शर्माने हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार... तुम्ही सर्व माझ्यासोबत असल्याने मी नशीबवान आहे. मला अदा फॅनक्लब्सकडून जास्तीत जास्त व्हिडीओ अपलोड करण्याची विनंती केली जात असल्यानेच मी हा नवा व्हिडीओ अपलोड करीत आहे.’ या व्हिडीओमध्ये अदा खरोखरच कमालीचा डान्स करताना बघावयास मिळत आहे. आता चाहत्यांना तिला काहीसा असाच डान्स करताना चित्रपटात बघावयाचे आहे.  दरम्यान, अदा शर्माने २००८ मध्ये ‘१९२०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. अदाने ‘हम है राही कार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिचे हे चित्रपट फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. त्यानंतर ती अभिनेता विद्युत जामवाल याच्यासोबत ‘कमांडो-२’मध्ये झळकली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली. त्याचबरोबर प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचे कौतुकही केले.