Join us  

अभिनेता वरुण सूदच्या मेंदूला गंभीर दुखापत, चाहते चिंतेत; नक्की झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 5:25 PM

वरुण सूदचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.

अभिनेता वरुण सूदच्या (Varun Sood) मेंदूला दुखापत झाली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली. डॉक्टरांनी त्याला स्क्रीनपासूनही दूर राहण्यास सांगितले असून तो काही काळ सोशल मीडियावरुन गायब असणार आहे. यामुळे वरुण सूदचे चाहते चिंतेत आहेत आणि त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.  

वरुण सूदने त्याला नेमकं काय झालंय हे सांगताना इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, 'हॅलो, मला ब्रेनमध्ये कन्कशन झालं आहे. मी कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ शकणार नाही. मला स्क्रीनटाईम कमी करण्यास सांगितलं आहे. मी लवकरच परत येईन."

कन्कशन हा मेंदूला झालेला आजार असतो ज्यामध्ये डोक्याला योग्य पद्धतीने काम करण्यासाठी अडचण येते. गोष्टींवर नीट फोकस करत नाही. तसंच गोष्टी लक्षात ठेवणं, बॅलन्स करणं यामध्येही अडचणी येतात. वरुणला इतका गंभीर आजार झाल्याचं कळताच चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहते त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. अद्याप वरुणने त्याला हा आजार नेमका कशामुळे झाला हे सांगितलेलं नाही. 

वरुणच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी सांगायचं तर तो 'रोडीज','स्प्लिट्सव्हिला' सारख्या शोजमध्ये दिसला आहे. यावर्षी त्याने 'कर्मा कॉलिंग' या सीरिजमध्येही काम केले. यामध्ये रवीना टंडन मुख्य भूमिकेत होती. तसंच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत सांगायचं तर तो दिव्या अग्रवालसोबत ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. २०२२ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.

टॅग्स :सेलिब्रिटीहॉस्पिटलसोशल मीडियाबॉलिवूड