Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानसोबत या अभिनेत्यानं काम करण्यास दिला नकार, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 18:06 IST

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. मात्र आता असं समजतंय की सुशांतने सारासोबत काम करण्यास नकार दिला आहे.

'केदारनाथ' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सुशांत सिंग राजपूत व सारा अली खान यांचे अफेयर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्यानंतर अमृता सिंगच्या सांगण्यावरून सारा सुशांतसोबत अंतर ठेवून राहू लागली होते. मात्र त्यामुळे सुशांत आणि सारा यांच्यात कटुता निर्माण झाली. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांतला एका जाहिरातीत सारासोबत काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र सुशांतने जाहीरातीत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतला कोणत्याही परिस्थितीत एक्ससोबत काम करायचे नाही. याशिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत सुशांत नात्यात असल्याचं बोललं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र फिरताना आणि डिनरला जाताना पाहण्यात आलं आहे. तर साराचंही कार्तिक आर्यनसोबत अफेअर असल्याच्या चर्चा आहेत.

सुशांतचा 'छिछोरे' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

तर सारा अली खान लवकरच इम्तियाज अली दिग्दर्शित सिनेमात कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.

याशिवाय ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन' सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यन