Join us  

रितेशच्या मुलांनी गळ्यातलं गोल्ड मेडल उतरवलं अन्..; जेनेलियाच्या संस्कारांचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 11:16 AM

Riteish deshmukh: सध्या सोशल मीडियावर रियान आणि राहील या रितेशच्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही मुलांनी एका स्पर्धेत गोल्ड मेडल्स मिळवले आहेत.

मराठीसह बॉलिवूडमध्येही लोकप्रिय असलेली जोडी म्हणजे रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia deshmukh). २०१२ साली लग्नाच्या बेडीत अडकलेल्या या दोघांच्या सुखी संसाराच्या वेलीवर दोन मुलांची फुलं उमलली आहेत. त्यामुळे या सेलिब्रिटींसह त्यांच्या मुलांचीही वरचेवर नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. रितेश आणि जेनेलिया यांनी त्यांच्या मुलांना उत्तम संस्कार दिले असून त्यांचे हे संस्कार त्यांच्या मुलांच्या वागणुकीतून कायम दिसून येतात.सध्या सोशल मीडियावर त्याच्या मुलांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर रियान आणि राहील या रितेशच्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही मुलांनी एका स्पर्धेत गोल्ड मेडल्स मिळवले आहेत. विशेष म्हणजे हे गोल्ड मेडल त्यांनी आजीच्या गळ्यात घालत तिच्याप्रतीचं प्रेम, आदर दर्शवला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर रितेशच्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या दोन्ही मुलांनी रविवारी एक फुटबॉल स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत त्यांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं. यानंतर त्याच्या दोन्ही मुलांनी घरी येऊन हे मेडल आपल्या आजीच्या गळ्यात घातलं. त्यानंतर त्यांनी आपल्या आजीला मिठी मारली.

दरम्यान, “रियान आणि राहिल या दोघांनीही फुटबॉल स्पर्धेत जिंकलेले मेडल्स मदर्स डे निमित्ताने आजीला दिले आहेत. आयुष्यातील काही क्षण अनमोल असतात. तुमच्या पालकांबरोबर वेळ घालवा. मुलांबरोबर वेळ घालवा”, असे कॅप्शन रितेशने या व्हिडीओला दिले आहे. रितेशचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. इतकंच नाहीतर अनेकांनी रितेश आणि जेनेलिया यांनी मुलांवर केलेल्या संस्कारांचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा