तारे जमीन पर या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन सुपरस्टार आमिर खानने केले होते. या चित्रपटाची सगळी गाणी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटाला दहा वर्षं पूर्ण झाली असली तरी या चित्रपटाचे फॅन फॉलॉव्हिंग अजून देखील कमी झालेले नाही. आमिरच्या कारकिर्दीतील अतिशय चांगल्या चित्रपटांमध्ये तारे जमीन पर या चित्रपटाची नक्कीच गणना केली जाते.
तुम्हाला माहीत आहे का, तारे जमीन पर या चित्रपटाचे नाव हे हाय जम्प असे ठेवण्याचे आमिर खान आणि त्याच्या टीमने ठरवले होते. पण हाय जम्प हे शीर्षक चित्रपटासाठी तितकेसे योग्य नाही असे आमिरचा जवळचा मित्र आणि बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला वाटले आणि त्याने आमिरला तारे जमीन पर हे शीर्षक सुचवले आणि आमिरला देखील सलमानचे हे शीर्षक आवडले आणि त्यामुळेच आमिरने चित्रपटाचे नाव बदलून तारे जमीन पर हे ठेवले. या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच या चित्रपटाचे शीर्षक देखील सगळ्यांनाच भावले होते. या शीर्षकांसाठी सलमानला नक्कीच श्रेय द्यावे लागेल.
तारे जमीन पर या चित्रपटासाठी दर्शल सफारीची निवड कशी झाली हे देखील खूप इंटरेस्टिंग आहे. दर्शल शामक दावरच्या डान्स इस्टिट्यूटमध्ये शिकत होता. या चित्रपटाच्या टीममधील काही लोकांना तिथे त्याला पाहिले आणि त्याला या चित्रपटासाठी ऑडिशनला बोलावले. दर्शलचे ऑडिशन आमिरनेच घेतले होेते. या ऑडिशनमध्येच त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास असल्याची आमिरला जाणीव झाली. त्याच्या बोलक्या डोळ्यांवर तर आमिर खूपच इम्प्रेस झाला होता आणि आमिरने त्याला या चित्रपटासाठी साईन केले.
Also Read : आमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ व ‘तारे जमीन पर’चे आहे एक स्पेशल कनेक्शन!