Join us

बॉलिवूडकर संतापले! फरहान अख्तर म्हणाला, मुंबईला ‘बेस्ट’ नाही, किमान ‘बेटर’ तर द्या!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 21:11 IST

अंधेरी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेनंतर मुंबईकरांचा संताप अनावर झाला. बॉलिवूडकरही याला अपवाद नव्हते. 

अंधेरी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने यात कुठलीही प्राणहानी झाली नाही. पण हजारो मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. शिवाय मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांचा निष्काळजीपणाही समोर आला. या घटनेनंतर मुंबईकरांचा संताप अनावर झाला. बॉलिवूडकरही याला अपवाद नव्हते. बॉलिवूडच्या काही संवेदनशील अभिनेत्यांनी या घटनेनंतर आपला संताप सोशल मीडियावर बोलून दाखवला. यात फरहान अख्तर सर्वात आघाडीवर होता.

 ‘मुंबईतील पायाभूत सुविधा किती तकलादू आहेत, हेच अंधेरी पूलाच्या घटनेवरून स्पष्ट होते. एक शहर जे सर्वाधिक महसूल देते, त्याला सर्वोत्कृष्ट नाही; किमान उत्कृष्ट तरी द्या. लज्जास्पद...’, अशा शब्दांत फरहानने आपला संताप सोशल मीडियावर बोलून दाखवला.

अभिनेत्री रेणुका शहाणे हिनेही या घटनेनंतरचा संताप व्यक्त केला.  ‘मुंबईकडून फक्त घेतलं जातं. जेवढी लोकसंख्या आहे, त्या मानानी मुंबईसाठी दिले जाणारे पैसे नेहमीच कमी असतात ही खंत आहे,’ अशा शब्दांत तिने आपली खंत बोलून दाखवली.

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिनेही ट्विटरवर याबद्दल लिहिले. ‘माझ्या मनात मुुंबईच्या लोकांबद्दल अपार आदर आहे. त्यांच्यातील लवचिकपणा, सकारात्मकता आणि ताकद...मुंबई तू खरचं प्रेरणादायी आहेस,’ असे ट्विट तिने या घटनेनंतर केले.

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटना