Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या बीचवर हॉट योगा करताना दिसली ‘ही’ अभिनेत्री; पतीनेच काढला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 19:22 IST

गोव्याच्या बीचवर हॉट योगा करतानाचा फोटो या अभिनेत्रीने शेअर केला. सध्या ती तिच्या पतीसोबत गोवा येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे.

अभिनेत्री रिया सेन हिला तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखले जाते. सध्या रिया पती शिवम तिवारीसोबत गोवा येथे हॉलिडे एन्जॉय करीत आहे. नुकतेच तिने तिच्या व्हेकेशनचे काही फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये असून, खूपच सेक्सी दिसत आहे. तिच्या चाहत्यांकडून तिचे हे फोटो चांगलेच पसंतही केले जात आहेत. आता रियाने आणखी एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये ती समुद्राच्या किनाºयावर हॉट योगा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, हा फोटो तिच्या पतीनेच कॅमेºयात क्लिक केला आहे. ALSO READ : गोव्यात एकटीच हॉलिडे एन्जॉय करताना दिसली ‘ही’ अभिनेत्री; गुपचूप केले होते लग्न!रियाचा पती शिवम तिवारी फोटोग्राफर असून, तो नेहमीच ट्रॅव्हल आणि डेस्टिनेशन्सचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करीत असतो. असो, रिया लवकरच निर्माती एकता कपूरच्या आगामी ‘रागिनी एमएमएस २.२’ या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. यामध्ये तिचा पुन्हा एकदा हॉट अंदाज बघावयास मिळण्याची शक्यता आहे. अखेरीस रिया दिग्दर्शक अग्निदेव चॅटर्जीच्या ‘डार्क चॉकलेट’ या बंगाली चित्रपटात बघावयास मिळाली होती. तिचा हा चित्रपट शीना बोरा मर्डर केसवर आधारित आहे.  रियाने गेल्यावर्षी १६ आॅगस्ट रोजी बॉयफ्रेंड शिवम तिवारीसोबत गुपचूप लग्न उरकले होते. पुण्यात पार पडलेल्या तिच्या या विवाह सोहळ्यासाठी मोजकेच लोक उपस्थित होते. लग्न केल्यापासून या जोडप्याने प्राग, लाओस, ऋषिकेश आणि दिल्ली यासारख्या ठिकाणी व्हेकेशन एन्जॉय केले. सध्या हे जोडपे गोवा येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. काही दिवसांपूर्वीच रियाने तिच्या व्हेकेशनचे बिकिनी फोटो शेअर केले होते, ज्यास तिच्या चाहत्यांकडून तुफान पसंत केले. तिचा हॉट योगा करतानाचा फोटोदेखील पसंत केला जात आहे.