Join us

Aamir Raza Hussain Death : थिएटर आर्टिस्ट आमिर रजा हुसैन यांचं निधन, ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 12:02 IST

'द फिफ्टी डे वॉर' सारख्या दमदार सिनेमातून त्यांनी क्रिएटिव्ह पॉवर दाखवत देशाला मेगा थिएटरचा अनुभव दिला होता. 

मनोरंजनविश्वाला धक्का देणारी बातमी. अभिनेते दिग्दर्शक आमिर रजा हुसैन (Aamir Raza Hussain)  यांचं निधन झालं आहे. काल रात्री दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आता आलेल्या 'बाहुबली', 'आरआरआर' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांपूर्वीच आमिर हुसैन यांनी 'द फिफ्टी डे वॉर' सारख्या दमदार सिनेमातून त्यांनी क्रिएटिव्ह पॉवर दाखवत देशाला मेगा थिएटरचा अनुभव दिला होता. 

अभिनेते आमिर रजा हुसैन यांचा जन्म 6 जानेवारी 1957 मध्ये लखनऊ येथे झाला होता. मुमताज हुसैन आणइ कनीज मेहीदा यांचे आमिर हुसैन एकुलते एक होते. आमिर यांच्या जन्मानंतर त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थायिक झालं. मात्र काही वर्षात त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यांचं सर्व शिक्षण दिल्लीतच झालं. तेव्हा कॉलेजमध्ये असतानाच त्यांना थिएटरची आवड लागली. त्यांनी जॉय मायकल, बैरी जॉन,  मार्क्स मर्च सारख्या दिग्दर्शकांसोबतही काम केलं आहे.  

'किम'(1984), तसंच सोनम कपूरच्या 'खूबसूरत' सिनेमात त्यांनी अभिनय केला होता. मात्र त्यांना थिएटरसाठी जास्त ओळखलं गेलं. आगामी 'आदिपुरुष' सिनेमातही त्यांनी आपल्या क्रिएटिव्हिटीचं दर्शन घडवलं आहे. आमिर हुसैन यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

टॅग्स :बॉलिवूडमृत्यू