रणवीरच्या अनुसार आमिर खान बॉलिवूडचा ‘गेमचेंजर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 15:08 IST
अभिनेता रणवीर सिंगच्या अनुसार मि. परफेक्शनिस्ट ‘आमिर खान हा बॉलिवूडचा गेम चेंजर असून, हिंदी सिनेमाची सर्वात ताकदवान व्यक्ती आहे.’...
रणवीरच्या अनुसार आमिर खान बॉलिवूडचा ‘गेमचेंजर’
अभिनेता रणवीर सिंगच्या अनुसार मि. परफेक्शनिस्ट ‘आमिर खान हा बॉलिवूडचा गेम चेंजर असून, हिंदी सिनेमाची सर्वात ताकदवान व्यक्ती आहे.’रणवीर हा आमिरचा मोठा ‘फॅन’ आहे. इंडिया टुडेने नुकताच व्हिडीओ शेअर केला असून, यात रणवीरने आमिरची घेतलेली मुलाखत आहे. यामध्ये रणवीरने दंगलस्टार आमिरविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्याच्याबाबत वाटणारे प्रेम आणि आदर यातून व्यक्त झाला आहे.या व्हिडीओमध्ये रणवीर आमिरची अफाट स्तुती करताना म्हणतो, ‘या अभिनेत्याच्या स्वागतासाठी जबरदस्त संगीत वाजविण्यात आले पाहिजे. आमिरसोबतच्या मुलाखतीसाठी त्याला मोठी तयारी करावी लागली. यापूर्वी त्याने असे कधी केलेले नाही.’आमिरविषयी कौतुक करताना रणवीर म्हणतो, ‘आमिर हा गेम चेंजर आहे. भारतीय रुपेरी पडद्यायवरील तो सर्वाधिक टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहे. अत्यंत धाडसी आणि शूर व्यक्ती आहे. भारतीय सिनेमाचा सर्वात यशस्वी मेगास्टार म्हणून आमिरची ओळख आहे.’रणवीरच्या या वक्तव्याने आमिरने भारावून जाताना म्हटले, ‘कृपया माझी ओळख करुन देताना इतके मोठे शब्द वापरु नकोस, मला अत्यंत अवघडल्यासारखे होते आहे’ आमिरचा आपण सर्वात मोठा फॅन असल्याचे रणवीरने सांगितले.ट्विटरवर आमिरने रणवीरबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.