Join us

​अभिषेकची इच्छा ; बच्चन कुटुंबातील सर्वांनी एकत्र काम करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 21:53 IST

अभिषेक बच्चन याने वडिल अमिताभ व पत्नी ऐश्वर्यासोबत काम केले आहे. आता त्याला आपल्या आईसह कुटुंबातील सर्व सदस्यांसह चित्रपटात ...

अभिषेक बच्चन याने वडिल अमिताभ व पत्नी ऐश्वर्यासोबत काम केले आहे. आता त्याला आपल्या आईसह कुटुंबातील सर्व सदस्यांसह चित्रपटात काम करण्याची इच्छा होत आहे. एका मुलाखती दरम्यान अभिषेक म्हणाला, माझी आई जया बच्चनसह आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य एकाच चित्रपटात एकत्र आल्यास आम्हा सर्वांना आनंद होईल.अभिनेते अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चनसह त्यांची पत्नी जया देखील उत्तम अभिनेत्री असून त्या समाजकारणात सक्रिय आहेत. मुलगा अभिषेक अभिनेता तर सून ऐश्वर्या ही देखील अभिनेत्री आहे. अमिताभ बच्चन यांची पार्श्वभूमी व विनम्रपणा त्यांंच्या इमेजमध्ये भर घालतो. याचमुळे बच्चन कुटुंबाचे नाव बॉलिवूडमध्ये आदराने घेतले जाते. एका मुलाखतीदरम्यान अभिषेक म्हणाला, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य एका चित्रपटात एकत्र आले तर यामुळे सर्वांना आनंद होईल. मात्र अशी कथा असायला हवी. आम्हा चौघांना आवडेल अशी कथा असेल तर त्याने प्रयत्न करावा. मात्र ही कथा सर्वांना आवडायला हवी. हे जरा कठिण काम आहे. आम्ही सर्व अभिनय क्षेत्रात असलो तरी सर्वांची स्वतंत्र ओळख आहे. यामुळे कथा व पटकथा चांगली असावी प्रत्येकाला अभिनेता म्हणून ती पसंत येणे गरजेचे आहे, असेही अभिषेकने सांगितले. याचवेळी त्याने प्रत्येकाच्या स्वतंत्र शैलीवर त्याने भर दिला. मात्र हे सांगत असताना त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. अमिताभ व जया यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. तर अमिताभ-अभिषेक व ऐश्वर्या यांनीही एकत्र काम केले आहे. मात्र जया बच्चन यांनी अभिषेक व ऐश्वर्या यांनी एकत्र काम केलेले नाही. अनेकांना बच्चन कुटुंबीयांनी एकाच चित्रपटात काम करावे असे वाटते.