Join us  

मुहूर्त ठरला 'या' दिवशी कमबॅक करणार अभिषेक बच्चन सिल्वर स्क्रिनवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 3:54 PM

अनुराग कश्यपचा सिनेमा 'मनमर्जिया' सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. यातील स्टारकास्टला घेण्याबाबत खूप काळ चर्चा झाली आणि शेवटी अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशलचे नाव फायनल करण्यात आले.

ठळक मुद्दे अभिषेक बच्चन दोन वर्षांपासून सिल्वर स्क्रिनवर पदार्पण करतोयकाही महिन्यांपूर्वी अभिषेकने सोशल मीडियावर आपला लूक शेअर केला होता

अनुराग कश्यपचा सिनेमा 'मनमर्जिया' सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. यातील स्टारकास्टला घेण्याबाबत खूप काळ चर्चा झाली आणि शेवटी अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशलचे नाव फायनल करण्यात आले. या सिनेमाच्या माध्यमातून अभिषेक बच्चन दोन वर्षांपासून सिल्वर स्क्रिनवर पदार्पण करतोय.

काही महिन्यांपूर्वी अभिषेकने सोशल मीडियावर आपला सिनेमातला लूक शेअर केला होता. यात त्यांने पगडी घातलेली दिसत होती. तापसीने देखील सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. 

याआधी या सिनेमाची रिलीज डेट 7 सप्टेंबर मेकर्सनी सांगितली होती मात्र आता मेकर्सनी नवी रिलीज डेटची घोषणा केली आहे.  आता हा सिनेमा 7 सप्टेंबर ऐवजी 21 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. अभिषेकचे फॅन्स त्याच्या या सिनेमाची वाट मोठ्या आतुरतेने बघत असतील यात काही शंका नाही. 

तापसीबाबत बोलायचे झाले तर तिने नुकताच आलेल्या सूरमा सिनेमात दमदार अभिनय करुन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच लवकरच ती ऋषी कपूर यांच्यासोबत काम करणार आहे. तापसीचा 'मुल्क' चित्रपटाचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. 'मुल्क' हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. तापसी यात ऋषी कपूर यांच्या सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सामान्य माणसाचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. अनुभव सिन्हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. तसेच तापसीने आपल्या मानधनात ही वाढ केल्याची चर्चा आहे.  साऊथ ऐवढेच मानधन बॉलिवूडमध्ये ही हवे आहे. तापसीचे साऊथमधले चाहते तिचे हिंदी चित्रपट ही पाहतात. यामुळे कदाचित तापसीने बॉलिवूडच्या दिग्दर्शकांकडे जास्त मानधन मागते आहे असा अंदाज लावण्यात येतो आहे. 

टॅग्स :अभिषेक बच्चन