बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंबाचं मोठं नाव आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन दोघंही दिग्गज कलाकार आहेत. त्यांचा मुलगा 'ज्युनिअर बी' अर्थात अभिषेक बच्चननेही इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलंय. तर सून ऐश्वर्या राय बच्चनला वेगळ्या परिचयाची गरज नाही. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर ती इंडस्ट्रीत सर्वात आघाडीवर आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांना एक मुलगी आराध्याही आहे. अभिषेक हा कायम पत्नी आणि लेकीबद्दल बोलत असतो. अशातच अभिषेकने ऐश्वर्या रायबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं.
अभिषेकनं लिली सिंगला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल म्हटलं की, त्यांच्या लग्नाचा पाया 'भागीदारी' (Partnership) हाच आहे. कधीही कामावरून स्पर्धा नसते. घरात कोण पुरुष, कोण स्त्री अशी कोणतीही स्पर्धा नाही. आम्ही दोघंही आमच्या मुलीसाठी उत्तम उदाहरण बनण्याचा प्रयत्न करतो.
पुढे अभिषेक बच्चनने नमूद केलं की, तो ऐश्वर्याला त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासून ओळखतो आणि त्यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलंय. आम्ही आधी मित्र होतो, मग आमचं नातं पुढे गेलं. आमची ओळख, साखरपुडा आणि लग्न हे सगळं एका पार्टनरशिपसारखं राहिलं. घर आणि कामाच्या बाबतीत आमच्यात कधीही ठराविक भूमिका वाटून दिलेल्या नव्हत्या.
अभिषेक म्हणाला, "मी असा माणूस नाही की मी जिंकावं दुसऱ्याने मागे हटावं. मला असं लग्न नको आहे, जिथे एकाला दुसऱ्यासाठी मागे हटावं लागेल". दरम्यान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायनं २० एप्रिल २००७ रोजी लग्न केलं. यावर्षी त्यांच्या लग्नाला १९ वर्षे पूर्ण होत आहेत.
Web Summary : Abhishek Bachchan emphasized his marriage with Aishwarya Rai is built on partnership, free from gender roles or professional rivalry. They prioritize being role models for their daughter and have always maintained equality in their relationship, both personally and professionally, since their early friendship.
Web Summary : अभिषेक बच्चन ने कहा कि ऐश्वर्या राय के साथ उनकी शादी साझेदारी पर आधारित है, जिसमें कोई लैंगिक भूमिका या पेशेवर प्रतिद्वंद्विता नहीं है। वे अपनी बेटी के लिए रोल मॉडल बनने को प्राथमिकता देते हैं और अपनी शुरुआती दोस्ती से ही व्यक्तिगत और व्यावसायिक रूप से अपने रिश्ते में समानता बनाए रखते हैं।