आमिरला पडलाय प्रश्न : ठग्स आॅफ हिंदोस्थामधील लूक असणार तरी कसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 18:13 IST
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आपल्या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतो. त्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असे वाटते, यामुळेच त्याला ‘मिस्टर ...
आमिरला पडलाय प्रश्न : ठग्स आॅफ हिंदोस्थामधील लूक असणार तरी कसा
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आपल्या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतो. त्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असे वाटते, यामुळेच त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली आहे. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असल्याने तो आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’साठी तयारी करतो आहे. मात्र, यात त्याचा लूक कसा असेल हे अद्याप आमिरला माहित नाही.‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’मध्ये मी कसा असेल हे मला दोन महिन्यानंतर कळेल, असे त्याने सांगितले. आमिर खानने ‘दंगल’ या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली होती. यासाठी त्याने बरेच वजन वाढविले होते. त्याचा वजन वाढविण्याचा व कमी करण्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हारल होत आहे. तर आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’ मध्ये तो एका सळपातळ युवकाच्या भूमिकेत दिसेल. सोबतच त्याची दाढी व मिशा वाढलेल्या दिसणार आहेत. यासाठी त्याने तयारी चालविली आहे. तो बराच वेळ जीममध्ये घाम जिरवत आहे व दाढी मिशा वाढविलेला आमिर विविध कार्यक्रमात दिसतो आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्थान’मध्ये त्याचा लूक कसा असेल हे त्याला स्वत:ला माहिती नाही. आमिर म्हणाला, सध्या मी शरीरावरील चरबी कमी करीत आहे. मला लठ्ठ व्हायचे नाही, ठग्स... मध्ये माझा लूक तसा नाहीच. मी सळपातळ युवकाच्या भूमिकेत आहे. ‘दंगल’च्या प्रमोशनसाठी पोहचेला आमिर डोक्यावर स्कार्फ बांधून व पिळदार मिशा वाढविलेल्या रुपात दिसला. आमिर म्हणाला, हा माझा लूक अमितजीसोबत (अमिताभ बच्चन) असणार आहे. हा कम्लिट लूक नाही. मी दाढी व केस वाढवित आहे, मला स्वत:ला माझा लूक कसा असेल हे माहित नाही. हे मला दोन महिन्यानंतर कळणार आहे. दंगलचे प्रमोशन टीव्हीवर करणार नसल्याचेही तो म्हणाला.