Join us

​आमिर म्हणतो; प्रेक्षकांचे प्रेम ‘आॅस्कर’पेक्षा कमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 20:48 IST

आॅस्कर अवॉर्डसाठी भारताकडून पाठविण्यात आलेल्या नामांकणात ‘सरबजित’ व ‘एम.एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी’ या दोन चित्रपटांची वर्णी लागली. नितेश ...

आॅस्कर अवॉर्डसाठी भारताकडून पाठविण्यात आलेल्या नामांकणात ‘सरबजित’ व ‘एम.एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी’ या दोन चित्रपटांची वर्णी लागली. नितेश तिवारी दिग्दर्शित आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाला प्रदर्शनापासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत असले तरी आॅस्करसाठी नामांकन मिळाले नसल्याने आमिर निराशा झालेला नाही. आपण पुढील वर्षी आॅस्करसाठी ट्राय करू असे मत त्याने व्यक्त केले आहे. ‘दंगल’च्या जबरदस्त ओपनिंग नंतरही आमिर खान प्रमोशनात व्यस्त आहे. या दरम्यान त्याला मीडियाकडून आॅस्करसाठी भारताकडून नामांकन मिळाले नसल्याच्या प्रश्नांना समोरे जावे लागत आहे. ‘दंगल’ हा चित्रपट २०१६ या वषार्तील प्रदर्शित होणारा शेवटचा चित्रपट असल्यामुळे यंदाच्या वर्षअखेर पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यांसाठी आणि विशेषत: आॅस्कर पुरस्कारांसाठी ‘दंगल’च्या नावाचा विचार करण्यात आला नाही. मीडियाशी संवाद साधताना आमिर म्हणाला, नोटबंदी झाल्यानंतर आमच्या चित्रपटावर फारसा फरक पडला नाही, यामुळे आम्हाला फार आनंद होत आहे, यावर्षी आॅस्करच्या शर्यतीत ‘दंगल’ची वर्णी लागला नसली तरी याचे फारसे दु:ख नाही. सध्या आम्ही पुरस्कारांचा विचार करत नाही आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादानेच मला आनंद होत आहे. आम्ही पुढील वर्षी आॅस्करसाठी आम्ही प्रयत्न करू असेही आमिर म्हणाला. }}}} या चित्रपटातील काही दृश्यांवर वाद सुरू असतानाच महावीर सिंग फोगट यांच्या मुलींनी पुढाकार घेत हा चित्रपट ९९ टक्के आमच्या जीवनावर आधारित असल्याचे मत गीता फोगट हिने व्यक्त केले आहे. आमच्या लहाणपनापासून ते प्रशिक्षणापर्यंतचे कथानक तसेच मांडण्यात आले आहे’ असे गीत फोगट हिने सांगितले. बबिता फोगटनेही गीताच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. दंगलची बॉक्स आॅफिसवर घोडदौड सुरू असून तो सोमवारी सर्वाधिक कलेक्शन करणाºया चित्रपटांच्या यादीत तिसºया स्थानी आला आहे. बॉक्स आॅफिसवर दंगलने १०० कोटींचा आकडा तीन दिवसातच पार केला असून या वर्षातील बॉक्स आॅफिसवर सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.