Join us

शाहरुख खानने दिलेल्या लॅपटॉपची आमिर खानने केली दशा...पाहा व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 14:46 IST

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सोशल मीडियावरचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत आमिर एक जुना किस्सा ऐकवतोय.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सोशल मीडियावरचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओत आमिर एक जुना किस्सा ऐकवतोय. आमिरला टेक्नॉलॉजीचे कसे वावडे आहे, हे आमिर यात रंगवून सांगतोय.अलीकडे आमिर एका इव्हेंटमध्ये सामील झाला. यावेळी बोलताना आमिरने शाहरूखने दिलेल्या एका लॅपटॉपचा किस्सा ऐकवला. आमिरने सांगितले की, मी टेक्नॉलॉजीपासून जितका दूर पळतो, तितका शाहरुख जवळ जातो. त्यावेळी शाहरुख व मी एका शोसाठी सोबत होतो. त्याचदरम्यान एक नवा लॅपटॉप लॉन्च झाला होता. शाहरुखने मला तो लॅपटॉप घेण्यासाठी आग्रह धरला. मला गरज नाही, असे मी त्याला अनेक परीने समजावले. पण तू घेच, हा त्याचा आग्रह होता. अखेर तू तुझ्यासाठी घेशील, तोच लॅपटॉप माझ्यासाठीही घे, असे मी शाहरुखला म्हणालो आणि सुटलो. शाहरूखने मला तो लॅपटॉप आणून दिला. पण पुढे पाच वर्षे मी तो साधा उघडलाही नाही. एकदिवस माझा मॅनेजर माझ्याकडे आला आणि त्याने तो मला मागितला. मी लगेच त्याला तो देऊन टाकला. पण अनेक प्रयत्न करूनही तो आॅन झाला नाही. त्याला अक्षरश: जंग चढला होता. आजही कम्युटर व लॅपटॉपवर काही पाहायचे असले की, मला माझ्या मुलांची वा टीमची मदत घ्यावी लागते. पण मी समोर आलो की, मशीन स्वत:च काम करणे थांबवतात. जणू आमिर आला, हे पाहून मशीन थांबते...आमिरने हा किस्सा सांगितला आणि सगळे हसू लागलेत. तुम्हीही आमिरचा हा व्हिडीओ बघा आणि पोटभर हसा...

टॅग्स :आमिर खानशाहरुख खान