Join us  

चक्क माधुरी दीक्षितच्या हातावर थुंकला होता आमीर खान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:10 PM

आमीर चित्रीकरणावेळी सेटवर खूप धमालमस्ती करत असतो. असेच एकदा 'दिल' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमीरने माधुरी सोबत प्रँक केले होते.

ठळक मुद्दे 'दिल' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमीरने माधुरीची केली होती मस्करी 'दिल'मधली आमीर व माधुरीची केमिस्ट्री भावली होती प्रेक्षकांना

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमीर खान व धकधक गर्ल माधुरी दीक्षित या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. मात्र या दोघांनी जास्त सिनेमात काम केले नाही. 'दिल' या सिनेमात या दोघांनी काम केले होते व यातील त्यांचे काम प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. त्यांनी दीवाना मुझ सा नहीं या चित्रपटात शेवटचे एकत्र काम केले होते. आमीर चित्रीकरणावेळी सेटवर खूप धमालमस्ती करतो. असेच एकदा 'दिल' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमीरने माधुरी सोबत प्रँक केले होते. जे कधीच माधुरी विसरणार नाही. 

आमीरने माधुरीसोबत काय प्रँक केले असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. 'दिल' सिनेमातील 'खंबे जैसी खडी है... ' या गाण्याचे शूटिंग चालू होते. त्यावेळी आमीरच्या डोक्यात माधुरीची थट्टा करण्याची कल्पना सुचली. आमीरने माधुरीला सांगितले की, 'मी लोकांचे हात पाहून भविष्य सांगतो.' हे ऐकताच माधुरीदेखील आपले भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक झाली आणि तिने आमीरला आपला हात पाहून भविष्य सांगायला सांगितले. आमीरने आधी तिचा हात नीट पारखून पाहिला आणि नंतर थुंकला होता. अशापद्धतीने आमीरने माधुरीची मस्करी केली.माधुरीला एका मुलाखती दरम्यान विचारले होते की आतापर्यंतची खट्ट्याळ गोष्ट कोणती आहे. त्यावर माधुरी म्हणाली होती की, ''दिल' चित्रपटाच्या सेटवर मी हॉकी स्टिक घेऊन आमीरच्या मागे धावली होती. कारण त्याने माझ्यासोबत प्रँक केला होता.तो प्रँक मी कधीच विसरू शकणार नाही. 'आमीर खान व माधुरी दीक्षितच्या चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायचे आहे. कदाचित ते दोघे दिग्दर्शक इंद्र कुमारचा आगामी चित्रपट 'टोटल धमाल'मध्ये एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'टोटल धमाल' चित्रपटात आमीर स्पेशल केमियो करताना दिसू शकतो आणि जर हे खरे असेल तर बऱ्याच वर्षांनंतर आमीर व माधुरीला स्क्रीनवर एकत्र पाहता येईल.

टॅग्स :आमिर खानमाधुरी दिक्षित