Join us  

आमिर खानच्या थोरल्या लेकाला कधी पाहिलंय का? वडिलांप्रमाणेच आहे 'परफेक्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 5:38 PM

Aamir khan son: आमिरप्रमाणे त्याचा थोरला लेक जुनैदही सोशल मीडियापासून चार हात लांब असल्याचं पाहायला मिळतं.

वर्षभरातून केवळ एक किंवा दोन चित्रपटांमध्येच काम करणारा अभिनेता म्हणजे आमिर खान (Aamir khan). सध्याच्या घडीला आमिर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिर कोणताही प्रोजेक्ट हाती घेण्यापूर्वी त्याचा प्रचंड अभ्यास करतो. विशेष म्हणजे आजवर त्याचे असंख्य चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. कलाविश्वात सक्रीय असलेला आमिर सोशल मीडियापासून अद्यापही लांब आहे. मात्र, त्याची लेक आयरा कमालीची सक्रीय असल्याची पाहायला मिळतं. इतकंच नाही तर आमिरप्रमाणे त्याचा थोरला लेक जुनैदही सोशल मीडियापासून चार हात लांब असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच्याविषयी, त्याच्या लाइफस्टाइलविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी कायम उत्सुक असतात. यामध्येच सध्या जुनैदचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

आमिरप्रमाणेच सोशल मीडियापासून दूर असलेल्या जैनदचा एक लेटेस्ट व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर त्याच्या दोन्ही मुलांसोबत आयरा व जुनैदसोबत दिसून येत आहे. सध्या या तिघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 वडील सुपरस्टार असूनही जुनैद अत्यंत साध्या पद्धतीने राहात असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे जुनैद अन्य स्टारकिडप्रमाणे नसल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जुनैदचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो वडिलांपेक्षाही प्रचंड साधा राहात असल्याचं दिसून आलं.

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा फोटो आमिरच्या फॅमिली लंचचा आहे. लंच करुन ते रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना या तिघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, जुनैद लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. पी. मल्होत्रा दिग्दर्शित 'महराजा' या चित्रपटात जुनैद म्हत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. सोबतच अभिनेत्री शर्वरी वाघ त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा