Join us

​आमिर खान म्हणाला, रणवीर सिंगला विचारणार की, सेक्सपूर्वी तो कुठले औषध खातो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:34 IST

आमिर खान आपल्या तीन आॅनस्क्रीन (दंगलमधील) मुलींसोबत अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅटशोमध्ये येऊन गेला. ‘कॉफी विद ...

आमिर खान आपल्या तीन आॅनस्क्रीन (दंगलमधील) मुलींसोबत अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅटशोमध्ये येऊन गेला. ‘कॉफी विद करण’म्हणजे धम्माल मस्ती आणि गमतीदार प्रश्न. आमिरही अशाच काही गमतीदार प्रश्नांना सामोरा गेला. या प्रश्नांच्या माध्यमातून करण जोहर आमिरची चांगलीच गंमत घेताना दिसला. पण आमिरही करणला पुरून उरला. शोवर अशी मस्ती सुरु असताना करणने आमिरला एक अनपेक्षित प्रश्न विचारला. हा प्रश्न पाहून सगळेच अवाक झालेत.सकाळी तू उठला आणि उठल्याबरोबर आपण रणवीर सिंह बनलो आहे, असे तुला कळले, तर तू काय करणार? असा प्रश्न करणने आमिरला केला. आमिरने एक क्षणही न गमावता या प्रश्नाचे उत्तर दिले. तो म्हणाला, मी सगळ्यांत आधी थोडा शांत होण्याची औषध खाणार. यालाच जोडून करणने आमिरला पुन्हा प्रश्न केला. तो म्हणजे,रणबीर कपूर बनलास तर? यावर आमिरने असे काही उत्तर दिले की, करणचीही बोलती बंद झाली. सकाळी उठून मी रणबीर कपूर झालोच तर सगळ्यांत आधी रणवीरला विचारणार की, सेक्सआधी तो कोणती टॅबलेट खातो आणि मी तीच टॅबलेट खाणार. यानंतरही करणने अशीच एक गुगली टाकली. दोन हिरो असलेला चित्रपट करायचा तर तू कुणासोबत करशील? असे करणने आमिरल विचारले. यावर आमिरने शाहरूख खानचे नाव घेतले. सेक्स थेरपी कोण चांगला देऊ शकेल, असा एक प्रश्नही रॅपिड फायर राऊंडमध्ये आमिरला विचारला गेला. यावर माझ्यातील हे दडलेले टॅलेंट आहे. अद्याप ते लोकांपुढे आलेले नाही, असे उत्तर आमिरने दिले. आमिर खान आपल्यावर लट्टू व्हावा, यासाठी मुलींना काय करावे लागेल? यावरही आमिरने असेच मजेशीर उत्तर दिले. मुलींना केवळ आमिर खानच्या जवळ यावे लागेल. बाकी काम आमिर स्वत:च करेल, असे आमिर म्हणाला.आता आमिरच्या या उत्तरांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले नसेल तर नवल...!!