Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानने अखेर पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीर-आदित्यच्या चित्रपटाबद्दल काय म्हणाला 'मिस्टर परफेक्शनिस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:16 IST

Aamir Khan Reviews Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar ...

Aamir Khan Reviews Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. प्रदर्शनाला १५ दिवस उलटले तरी या चित्रपटाची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाहीये. दाक्षिणात्य सुपरस्टार्सनंतर आता बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात आमिर खान (Aamir Khan) यानेही हा चित्रपट पाहिला असून, त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपटांमधील बारकावे शोधण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमिर खानने आपल्या 'आमिर खान प्रॉडक्शन'च्या सोशल मीडिया हँडलवरून या चित्रपटाचे कौतुक केले आहे. आमिरने लिहिले, "धुरंधर: द रिव्हेंजच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन! तुमची जिद्द, तुमची दृष्टी आणि तुमची कठोर मेहनत प्रेक्षकांच्या मनाला खरोखरच भावली आहे". विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात आमिरने हा चित्रपट पाहिला नव्हता, पण चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने अखेर वेळ काढून हा 'स्पाय थ्रिलर' पाहिला आणि टीमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

रणवीर सिंगचा दमदार अभिनय आणि आदित्य धरचे दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.  यापूर्वी प्रियंका चोप्रा आणि विकी कौशल यांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले होते. 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून अवघ्या काही दिवसांत चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Aamir Khan finally watches 'Dhurandhar 2,' praises Ranveer-Aditya film.

Web Summary : Aamir Khan lauded Ranveer Singh and Aditya Dhar's 'Dhurandhar 2' after watching it. He praised the team's dedication and vision, acknowledging its impact on audiences. The film, already a blockbuster, received accolades from Priyanka Chopra and Vicky Kaushal as well.
टॅग्स :आमिर खानधुरंधर सिनेमा