२००१ साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक समजला जातो. आमिर खानने साकारलेलं 'भुवन' हे पात्र अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे. या 'लगान' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष स्क्रीनिंगमध्ये सुपरस्टार आमिर खान सहभागी झाला होता. या कार्यक्रमात आमिरने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या काही अशा गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकून चाहते थक्क झाले आहेत.
आमिर खाननं या कार्यक्रमात बोलताना 'लगान'च्या शूटिंगशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या. त्यानं सांगितलं की चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी सेटवर जाताना तो आणि त्याचे सहकलाकार गायत्री मंत्र ऐकत असत. तो म्हणाला, "जेव्हा आपण कामावर जातो, तेव्हा आपली मानसिक अवस्था कशी आहे हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. आम्ही सूर्योदय होण्यापूर्वीच प्रवास सुरू करायचो. बसमध्ये अंधार असायचा आणि त्या वेळेत आम्ही गायत्री मंत्र ऐकायचो, ज्यामुळे ध्यान केंद्रित करण्यात मदत होत असे".
ऑस्करपर्यंत मजल
'लगान' या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. ऑस्करच्या नामांकन अंतिम यादीत येण्याचा मानही या सिनेमानं मिळवला. चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना आमिर भावुक झाला. तो म्हणाला, "प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो, पण फार कमी चित्रपटांना प्रेक्षकांचे इतके प्रेम आणि आदर मिळतो. आजही या चित्रपटाची शेवटची १० मिनिटे पाहताना मी भावूक होतो". आयएमडीबीवर (IMDb) ८.१ रेटिंग असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आजही पसंती देतात.
Web Summary : Before 'Lagaan' shoot, Aamir Khan and cast listened to Gayatri Mantra for focus. The film, celebrating 25 years, reached the Oscars and remains beloved for its impactful story.
Web Summary : 'लगान' की शूटिंग से पहले, आमिर खान और कलाकार ध्यान केंद्रित करने के लिए गायत्री मंत्र सुनते थे। 25 साल मना रही यह फिल्म ऑस्कर तक पहुंची और अपनी प्रभावशाली कहानी के लिए आज भी पसंद की जाती है।