Join us

अवार्ड शोमध्ये सामील होणार का आमिर खान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 15:07 IST

आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आमिर कधीच कुठल्या अवार्ड शोमध्ये सहभागी होत नाही. पण कदाचित वाढत्या स्पर्धेत ...

आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आमिर कधीच कुठल्या अवार्ड शोमध्ये सहभागी होत नाही. पण कदाचित वाढत्या स्पर्धेत आमिरला आपली काही तत्त्वे बाजूला ठेवावी लागणार आहेत. होय, आपल्या ‘दंगल’ या आगामी सिनेमासाठी आमिरने स्वत:च आपल्या तत्त्वांना मूठमाती दिल्याचे दिसतेय. ‘दंगल’च्या प्रमोशनसाठी आमिर एका अवार्ड शोमध्ये सामील होणार आहे. अर्थात यातही एक टिष्ट्वस्ट आहे.गेल्या अनेक वर्षांत आमिर खान वेगवेगळ्या चित्रपटांतील भूमिकांसाठी अनेकदा नॉमिनेट झाला. पण तरिही आमिरने अवार्ड शोमध्ये जाणे टाळले. पण आताश: आमिर काहीसा मवाळ झालेला दिसतोय आणि एका लवकरच होऊ घातलेल्या अवार्ड शोमध्ये सामील होणार आहे.आता अवार्ड शोमध्ये आमिर कशी एन्ट्री घेणार, कशा लूकमध्ये दिसणार, याच्या तुमच्या कल्पना सुरु झाल्या असतील. तर थांबा...आमीर या शोमध्ये येणार आहे. पण प्रत्यक्ष नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून. आमिरने या अवार्ड शोसाठी खास व्हिडिओ तयार केला आहे. यात त्याने त्याच्या आवाजात ‘दंगल’चे ‘धाकड...’ हे गाणे रेकॉर्ड केले आहे. हा व्हिडिओ या शोमध्ये दाखवला जाणार. ‘दंगल’च्या माध्यमातून आमिर महिला सक्षमीकरणाचा मुद्दा लावून धरणार आहे. संबंधित अवार्ड शोमध्येही महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे.आमिरला हा उद्देश कळवल्यावर त्याने यात व्हिडिओच्या माध्यमातून का होईना, हजेरी लावण्यास होकार दिला. आता व्हिडिओ तर व्हिडिओ पण आमिर एखाद्या अवार्ड शोमध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सामील होणार, हे काय कमी आहे?१८ वर्षांपूर्वी आमिरने ‘गुलाम’ या सिनेमात ‘आती क्या खंडाला’ हे गाणे गायले होते.