Join us

​यामुळे स्नॅपडीलच्या जाहिरातीमधून निघाला आमिर खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 16:54 IST

अभिनेता आमीर खान आपल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच अडचणीत आला होता. यामुळे स्नॅपडीलने त्याला आपल्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर पदावरून हटविले होते. ...

अभिनेता आमीर खान आपल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच अडचणीत आला होता. यामुळे स्नॅपडीलने त्याला आपल्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर पदावरून हटविले होते. सोशल मीडियातून आमिरवर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावर हे कारस्थान घडवून आणणाºयांचा खुलासा झाला आहे. एबीपी या संके त स्थळावरील बातमीनुसार, पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या आगामी ‘आय एम ए ट्रोल’ या पुस्तकातून आमिर खानच्या विरोधात चालविण्यात आलेल्या ट्रोलची माहिती दिली आहे. या पुस्तकात साध्वी खोसला या एकेकाळी भाजपच्या मीडिया सेलमध्ये काम करणाºया माजी कार्यकर्तीचे अनुभव सांगण्यात आले आहेत. राजधानी नवी दिल्लीत २३ नोव्हेंबर २०१५ ला रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभात आमिर खान याने असहिष्णुतेच्या मुद्यावर एक वक्तव्य केले होते. यानंतर आमिरच्या विरोधात सोशल मीडियावरून मोहिम सुरू करण्यात आली. यामुळे वातावरण चांगलेच तापले. ज्यांनी यात पुढाकार घेतला होता त्यात साध्वी खोसला या कार्यकर्तीचा त्यात सहभाग होता. त्यावेळी कॉजेस डॉट कॉम या वेबसाईटवर एक कॅम्पेनही सुरू करण्यात आलं होतं. त्यामध्ये स्नॅपडीलने आपल्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर पदावरुन आमिर खानला हटवावं, अशी मागणी करण्यात आली होती. आमिर खानविरोधी ट्रोल्सनी राबवलेली प्रचार मोहीम एवढी मोठी होती की, सोशल मीडियात विशेष लोकप्रिय असलेल्या अमूल बटरच्या जाहिरातीमध्येही त्याची दखल घेण्यात आली. शेवटी विक्रीवर परिणाम झाल्याचं कारण देऊन स्नॅपडीलने आमीर खानबरोबरचा करार पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला.या संपूर्ण प्रकरणामागे भाजपा आयटीसेलचे प्रमुख अरविंद गुप्ता यांनी पुढाकार घेतला होता. यांच्याकडून सर्व कार्यकर्त्यांना आलेले मेसेज आणि पोस्टचे स्क्रीन शॉट या साध्वी खोसलाने पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्याशी शेअर केले आहेत. यामुळे आमिर वक्तव्यास विनाकारण महत्त्व देण्यात आले होते असा आरोप लावण्यात आला आहे. यावर अरविंद गुप्ता यांच्याशी सपर्क साधल्यावर त्यांनी याचा इन्कार केला असून, साध्वी खोसला आधीपासूनच काँग्रेस समर्थक होती. त्याचमुळे तिने आयटी सेल सोडला असेही सांगितले.