Join us

Video: 'कुली'च्या ट्रेलर लाँचला आमिर खान सर्वांसमोर रजनीकांतच्या पाया पडला, पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 14:11 IST

कुली सिनेमाच्या ट्रेलर लाँचचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे. आमिर-रजनीकांतला चाहत्यांनी प्रेम दर्शवलं आहे

प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या आगामी चित्रपट ‘कुली’ चा ट्रेलर नुकताच चेन्नईमध्ये मोठ्या कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला. या कार्यक्रमात बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान विशेष पाहुणा म्हणून हजर होता. या वेळी दोघांमध्ये घडलेला एक छोटासा क्षण सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ‘कुली’ सिनेमात आमिर खानही छोट्याश्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात आमिरचा जो लूक आहे त्याच लूकमध्ये तो ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित होता. तेव्हा आमिरने केलेल्या कृतीकडे सर्वांचं लक्ष वेधलं.

आमिर रजनीकांतच्या पाया पडल्या अन्...

‘कुली’ सिनेमाच्या स्टेजवर रजनीकांत यांना भेटताच आमिर खानने वाकून रजनीकांत यांच्या पायाला स्पर्श करत नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रजनीकांतने ताबडतोब आमिरला थांबवत उभं केलं आणि त्याला प्रेमाने मिठी मारली. हा सुंदर आणि आदरभावनेने भरलेला क्षण पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आमिर आणि रजनीकांत यांच्यामध्ये परस्परांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे, हे दर्शवलं.  

‘कुली’ सिनेमाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यात रजनीकांत नेहमीप्रमाणेच अॅक्शन आणि स्टाईलने भरलेला रोल करताना दिसत आहे. आमिर खान सुद्धा एका हटके निगेटिव्ह भूमिकेत झळकतो. आमिरच्या लूकचं आणि संवादफेकीचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. ‘कुली’ हा अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला सिनेमा आहे, जो १४ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी ‘वॉर २’ हा बॉलिवूडचा मोठा सिनेमाही रिलीज होत असल्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये मोठी टक्कर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :आमिर खानरजनीकांतबॉलिवूडTollywood