Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खान व फातिमा सना शेखा इंटेन्स सीन आणि वाद पक्का??

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 11:00 IST

‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिची यशराज बॅनरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये वर्णी लागल्याची बातमी कालच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. होय, ...

‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिची यशराज बॅनरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये वर्णी लागल्याची बातमी कालच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. होय, आमिरच्या या चित्रपटात त्याच्या अपोझिट फातिमा सना शेख हिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणा-या या चित्रपटात कुण्या हिरोईनची वर्णी लागेल, यावरून बरीच चर्चा रंगली होती.ALSO READ : ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी आमिर खानने तोडला नियम!!या चित्रपटांच्या शर्यतीत श्रद्धा कपूरपासून आलिया भट्ट, क्रिती सॅनन अशा सगळ्यांच्या नावांची चर्चा होती. पण अखेर फातिमाने बाजी मारली. खरे तर प्रारंभी फातिमाच्या नावासाठी विरोध होत असल्याची एक वेगळीच चर्चा ऐकायला मिळाली होती. आमिरच्या या चित्रपटात एक इंटेन्स किसींग सीन आहे. आमिर व हिरोईनमध्ये हा सीन चित्रीत होणार आहे. याच एका सीनमुळे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा निर्माता आदित्य चोप्रा फातिमाला या चित्रपटात घेण्यास कचरत होता. कारण काय तर ‘दंगल’मध्ये आमिर व फातिमाने बाप-लेकीची भूमिका साकारली होती. पण आता फातिमा या चित्रपटासाठी फायनल झाली आहे. सांगायचा मुद्दा हा की, कदाचित येत्या काळात या चित्रपटातील हा एक सीन मोठा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. तूर्तास या चित्रपटाबद्दल अफवांचा बाजार गरम आहे. अफवा खºया मानाल तर या चित्रपटात एक ड्रीम सीक्वेंस आहे. यात फातिमा व आमिर यांच्या एक इंटेन्स किसींग सीन शूट होणार आहे.खरे तर आमिरच्या प्रत्येक चित्रपटाशी कुठला ना कुठला वाद जुळलेला असतो. कदाचित ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी हा एक सीन पुरेसा ठरावा. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात आमिर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करीत असून, त्यांना ‘धूम’ फ्रेंचाइजीसाठी ओळखले जाते.  यशराजच्या या चित्रपटात पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र बघावयास मिळणार आहेत.