Join us

उर्मिला मातोंडकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपलं सासूचं छत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:10 IST

Urmila Matondkar :उर्मिला मातोंडकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या सासूचे निधन झाल्याचे त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.

बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) अभिनयापासून दूर असल्या तरी त्या सोशल मीडियावर सक्रीय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या सासूचे निधन झाल्याचे त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी इंस्टाग्रामवर सासूचा फोटो शेअर करत लिहिले की, माझी सासू. ताकदवान, धाडसी, प्रेमळ आणि बुद्धीवान अशी महिला होती. मम्मी जी, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.

उर्मिला मातोंडकर यांनी पती मोहसिन अख्तर मीर यांच्यासोबत २०१६ साली लग्न केले होते. ते काश्मिरी मुस्लीम आहेत आणि पेशाने मॉडेल आणि व्यावसायिक आहेत. लग्नानंतर उर्मिला मातोंडकर यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता उर्मिला राजकारणात सक्रीय झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांना ट्रोल करण्यात आले होते.

वर्कफ्रंट...उर्मिला मातोंडकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांनी बालकलाकार म्हणून कलाविश्वात पाऊल टाकले होते. रंगीला, जुदाई, सत्या, कौन, प्यार तूने क्या किया, भूत आणि एक हसीना थी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :उर्मिला मातोंडकर