Join us

५१ वर्षीय मलायका अरोराला दुसऱ्यांदा करायचंय लग्न?, अभिनेत्री म्हणाली- "मी खूप...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:02 IST

Malaika Arora : १९ वर्षांच्या लग्नानंतर मलायका अरोराचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाला. आता ५१ वर्षीय अभिनेत्रीने पुन्हा लग्न करण्याबद्दल एका मुलाखतीत स्पष्टच बोलली.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ५१ वर्षीय मलायका अरोरा दुसऱ्यांदा लग्न आणि प्रेमाबद्दल बोलली आहे. मलायका अरोराने १९९८ मध्ये बॉलिवूड अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. दोघांनाही एक मुलगा अरहान खान आहे. लग्नाच्या १९ वर्षांनंतर २०१७ मध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला. २०२३ मध्ये अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसरे लग्न केले.

मलायका अरोरा 'पिंकविला'शी बोलताना म्हणाली, ''मला नेहमीच माझे लग्न आवडेल पण जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा विचार केला तेव्हा सर्वांनी मला प्रश्न विचारले. पण आज मी आनंदी आहे. जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा लोकांनी मला स्वार्थी म्हटले. लोक म्हणाले की मी स्वतःला कसे पहिले प्राधान्य देऊ शकते. समाजाला वाटते की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मुलाबद्दल आणि पतीबद्दल विचार करावा आणि नंतर स्वतःबद्दल विचार करावा. पण मी आधी स्वतःबद्दल विचार केला आणि मी खूप आनंदी आहे.''

मलायकाने तरुणींना दिला हा सल्लामलायका अरोराने तरुणींना सल्ला दिला आहे की, ''मी म्हणेन की लवकर लग्न करू नका. आधी स्वतःला समजून घ्या आणि काहीतरी करा. जीवनाचा आनंद घ्या आणि जेव्हा तुम्हाला सर्वकाही समजेल तेव्हा लग्न करा.'' जेव्हा मलायका अरोराला पुन्हा लग्न करण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली,''हो, मी खूप रोमँटिक आहे आणि कधीही नाही म्हणत नाही.'' अशाप्रकारे, मलायका अरोराला पुन्हा लग्न करण्यास कोणतीही अडचण नाही. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराने बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याला सुमारे ५ वर्षे दिली. मात्र त्या दोघांचेही ब्रेकअप झाले.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खानअर्जुन कपूर