Join us

​२०१६ ठरले ट्रोलिंग इयर - कोणाची उडवली गेली सर्वाधिक टर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:53 IST

यंदाचे वर्षसुद्धा काही सेलिब्रेटींना ‘ट्रोलिंग’साठी कायमचे लक्षात राहील. ते सेलिब्रेटी कोणते?

इंटरनेट आणि खास करून सोशल मीडियाच्या जमान्यात सेलिब्रेटींना ‘थट्टेचा विषय’ बनवणे फार सोपे आणि कॉमन झाले आहे. बिचारे सेलिब्रेटी एकही शब्द वाकडे बोलले की, ‘ट्रोलिंग’चा भडिमार सुरू होतो.आलिया भट्टपेक्षा जास्त याबाबत कोण चांगले सांगू शकते. तिने करण जोहरच्या शोमध्ये राष्ट्रपतीचे चुकीचे नाव घेतले आणि तिच्या बुद्धीची कीव करावी एवढे जोक्स व्हायरल झाले. यंदाचे वर्षसुद्धा काही सेलिब्रेटींना ‘ट्रोलिंग’साठी कायमचे लक्षात राहील. ते सेलिब्रेटी कोणते?१. शिल्पा शेट्टीशिल्पा शेट्टीलहान मुलांना प्राण्यांची काळजी कशी घ्यावी हे शिकवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात जॉर्ज आॅरवेल लिखित ‘अ‍ॅनिमल फार्म’चा समावेश करण्याची सूचना शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीमध्ये केली. नावावरून हे पुस्तक तिला बालसाहित्य वाटले आणि सगळा घोटाळा झाला. तिचे साहित्यविषयीचे हे अज्ञान पाहून मग ट्विपलर्सनी ‘#शिल्पाशेट्टीरिव्ह्युवज्’ या हॅशटॅगसह तिची खिल्ली उडवली. 
२. पिअर्स ब्रॉसनन                                                                      पिअर्स ब्रॉसननएकेकाळी जेम्स बॉण्डची भूमिका साकारलेला हॉलीवूड अभिनेता पिअर्स ब्रॉसननला पान मसाल्याच्या एका ब्रँडची जाहिरात केल्यामुळे ट्विटराटींच्या संताप आणि विनोदबुद्धीची झळ सोसावी लागली. लोकप्रिय अभिनेत्याने अशाप्रकारे तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करणे नेटिझन्सला मुळीच आवडले नाही. म्हणून तर मग त्याचे फोटो मॉर्फ करून त्याची टर उडवली गेली.
३. सोनम कपूरसोनम आणि ट्रोलिंग तसे जुनेच कनेक्शन आहे. आपल्या जीभेवर नियंत्रण नसणारी सोनम तिच्या बेताल स्टेटमेंटस्मुळे नेहमीच वाद स्वत:हून ओढून घेते. ट्विटरकरांना तिच्याविषयी जोक करण्यासाठी विशेष अशी मेहनत घ्यावी लागत नाही. यावर्षी मात्र तिला स्वत:च्या फॅशनमुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.बॉलीवूडची सर्वात फॅ शनेबल स्टार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सोनमने कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर घातलेला लांबलचक पांढरा ड्रेसवरून तिची बरीच खिल्ली उडवण्यात आली. तिच्या ड्रेसची तुलना रूमाली रोटी, डोसा आणि सर्कसच्या तंबूशी करण्यात आली. बिचारी सोनम!
४. ऐश्वर्या राय-बच्चनया वर्षीचा कान्स फेस्टिव्हल भारतीय सेलिब्रेटींसाठी फारसा विशेष नाही ठरला. सोनमची ड्रेसमुळे तर बच्चन खानदानाची सून ऐश्वर्याची तिच्या लिपस्टिकच्या रंगामुळे इंटरनेटवर ट्रोलिंग झाली.ऐशने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावून रेड कार्पेटवर अवतरली. तिच्या ओठांवर जांभळा रंग पाहून तर हसू रोखणे शक्य नव्हते. ‘ऐश्वर्या काला खट्टा गोळा खाऊन तशीच आली’ असे विनोद व्हॉटस् अ‍ॅप आणि ट्विटरवर व्हायरल झाले.
५. शोभा डेवादग्रस्त व्यक्तिमत्त्व शोभा डे आणि ट्विपर्लसचे जणूकाही हाडा-मासांचे वैर आहे. मायक्रोब्लॉगिंग साईटवर अधूनमधून तिखट आणि बोचरे विधान करून लोकांचा रोष ओढावून घेण्याची तशी शोभा डेंना सवयच आहे. यावेळेस आॅलिम्पिक खेळांडूवर टीका करताना त्यांनी ट्विट केले होते की, ‘आपल्या खेळाडूंचे ध्येय म्हणजे रिओला जाऊन केवळ सेल्फी काढायच्या आणि रिकाम्या हाताने परतायचे.पैशाचा अपव्यव नुसता!’ यावरून मग तिच्यावर सर्वच स्तरातून टीकेचे झोड उठली. वायफळ बडबड करणे हा जर आॅलिम्पिकमध्ये खेळ असता तर शोभा डेंनी जरूर भारताला सुवर्णपदक मिळवून दिले असते, अशा प्रतिक्रिया उमटल्या. सेहवागनेसुद्धा त्याच्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला होता.
६. प्रियंका चोप्रादेसी गर्ल प्रियंकाला एका मॅगझिनच्या कव्हर फोटोवरून ट्रोलिंग सहन करावी लागली. या कव्हर फोटोमध्ये फोटोशॉपद्वारे इफेक्टस् देऊन प्रियंकाचे सौंदर्य आणि खासकरून अंडरआर्म्स मुलायम करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली; परंतु ‘राईचा पर्वत’ करण्याची नेटिझन्सला सवयच आहे.                                        प्रियंकाने इन्स्टाग्रामवर तिचे अंडरआर्म्स स्पष्ट दिसतील असा फोटो शेअर केला आणि टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले की, ‘विनाकारण सुरू असलेल्या चर्चेला आणखी एक मुद्दा.’ वाह प्रियंका ये हुई ना बात!                                             तसेच दुसऱ्या एका मॅगझिनच्या कव्हर फोटोमध्ये तिने घातलेल्या टी-शर्टवर निर्वासितांच्या समस्येला कमी लेखणाऱ्या संदेशामुळेदेखील तिच्यावर टीका झाली होती.
७. कॅटरिना कैफ                                                                        स्मिता पाटील अ‍ॅवॉर्ड : नितीन गडकरींच्या हस्ते परस्कार स्वीकारताना कॅटरिना कैफरणबीरसोबत ब्रेक झाल्यानंतर कॅटला मन:शांतीची गरज होती. परंतु सोशल मीडियामुळे ती मिळणे काही शक्य झाले नाही. कॅटची अभिनय क्षमता किती हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तिला जेव्हा लिजेंडरी अ‍ॅक्ट्रेस स्मिता पाटील यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा ट्विटराटींना ते सहन होणे शक्यच नव्हते.                                                 कॅटला ‘स्मिता पाटील पुरस्कार’ देणे म्हणजे साजिद खानला आॅस्कर देण्यासारखे आहे, असे मजेशीर जोक्स फिरू लागले. स्मिता पाटील यांचे भूत कॅटची निवड करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहे, इथपर्यंत लोकांनी ट्रोलिंग केले.
८. बॉबी देओलडीजे: बॉबी देओलबॉबी देओल बरेच वर्र्षे झाली मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मध्यंतरी त्याने अ‍ॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकला असेदेखील ऐकायला मिळत होते. त्यातच तो आता डीजे झाल्याची बातमी आली आणि सगळेच हैराण झाले. बॉबीचे असे करिअर स्वीच करणे आणि तेदेखील डीजे म्हणून, ही गोष्ट नेटिझन्सला पचायला जरा जडच गेली.                                          दिल्लीच्या एक क्लबमध्ये त्याने पहिल्याच शोमध्ये गुप्तचे गाणे वारंवार वाजूवन उपस्थितांचा रोष ओढावून घेतला. त्याचे डीजे करिअर तर तेथेच संपले, वर लोकांनी कार्यक्रमाचे पैसेसुद्धा परत मागितले.                                           अश्मित पटेललादेखील डीजे होणे महागात पडले. डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे हेडफोन्स लावलेल्या पोस्टरवरून त्यांची पुरती नाचक्की झाली.