Join us

बॉलीवूडचा आवाज मराठीत घुमतोय

By admin | Updated: August 31, 2016 02:05 IST

मराठी चित्रपटसृष्टीची भुरळ सध्या अनेक कलाकारांना पडली आहे. बॉलीवूडच काय, पण थेट सातासमुद्रापलीकडील कलाकार मराठी चित्रपटांमध्ये झळकत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीची भुरळ सध्या अनेक कलाकारांना पडली आहे. बॉलीवूडच काय, पण थेट सातासमुद्रापलीकडील कलाकार मराठी चित्रपटांमध्ये झळकत आहेत. अभिनयच नाही, तर संगीतक्षेत्रालाही मराठी चित्रपटसृष्टी खुणावू लागली आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायकांनी आपल्या जादुई आवाजाची मोहोर मराठीत उमटवली आहे. मन्ना डे, किशोरकुमार, सोनू निगम, शंकर महादेवन, श्रेया घोषाल, विशाल दादलानी आणि शान यासारख्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायकांनी आतापर्यंत मराठीत पार्श्वगायन केले आहे. मराठी चित्रपटात गाणाऱ्या या बॉलीवूडमधील गायकांवर एक नजर टाकू या...किशोरकुमारगंमत जंमत या चित्रपटातील ‘अश्विनी ये ना...’ हे गाणे किशोरकुमार यांनी गायले होते. बॉलीवूडमध्ये अनेक सुपरस्टार्सना आवाज देणारे किशोरकुमार यांनी अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला आवाज दिला होता. हे गाणे त्यांनी अफलातून गायले होते. आजही या गाण्याची जादू रसिकांच्या मनावर आहे.सोनू निगमसचिन पिळगावकर आणि सोनू निगम यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. आपल्या मित्राने आपल्यासाठी पार्श्वगायन करावे, असे सचिन पिळगावकर यांना वाटले आणि ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात सोनूने गाणे गायले. ‘हिरवा निसर्ग...’ हे सोनूने गायलेले गाणे प्रचंड गाजले होते. त्यानंतर, ‘दुनियादारी’ या चित्रपटात ‘टिक टिक’ वाजते डोक्यात या गाण्याला सोनूने आवाज दिला.शंकर महादेवनबॉलीवूडमधील आघाडीचे संगीत दिग्दर्शक आणि गायक म्हणून शंकर महादेवन यांची ओळख आहे. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.श्रेया घोषालअतिशय सुंदर गाणी गाऊन रसिकांची मने जिंकलेल्या श्रेयानेदेखील अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. ‘जोगवा’ चित्रपटात श्रेयाने गायलेले ‘जीव रंगला’ हे गाणे प्रचंड हिट झाले होते, तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील ‘आताच बया का बावरलं’ हे गाणे तिने गायले आहे.शानशानच्या आवाजात एक वेगळीच नशा आहे. वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्यासाठी शान ओळखला जातो. चिन्मय मांडलेकर आणि गायत्री सोहम् यांच्यावर चित्रित करण्यात आलेले रेती या चित्रपटातील एक थीम साँग शानने गायले होते, तसेच प्रकाश कुंटे यांच्या आगामी सायकल या सिनेमात तो गाणार आहे.