Join us

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचं एक्स अकाउंट हॅक; चाहत्यांना माहिती देत म्हणाली...

By सुजित शिर्के | Updated: March 1, 2025 13:11 IST

लोकप्रिय बॉलिवूड पार्श्वगायिका श्रेया घोषालचं एक्स अकाउंट हॅक, शेअर केली पोस्ट

Shreya Ghoshal Post: लोकप्रिय बॉलिवूड पार्श्वगायिका श्रेया घोषाल  (Shreya Ghoshal) तिच्या गाण्यांमुळे कायम चर्चेत असते. आपल्या गोड आवाजाने तिने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. श्रेयाने आजवर अनेक हिंदी मराठी गाणी गायली आहेत. तिने गायलेली अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. सध्या श्रेया घोषालसोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच श्रेया घोषालचं एक्स अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे ती एक्सवर काही काळ सक्रिय नव्हती, याची माहिती देखील तिने चाहत्यांना दिली आहे.

नुकतीच श्रेया घोषालने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गायिकेने लिहिलंय की, "सर्वांना नमस्कार..., १३ फेब्रुवारीपासून माझं एक्स अकाउंट हॅक झालं आहे. मी माझ्याकडून एक्स टीमला संपर्क करण्याचे बरेच प्रयत्न केले. पण, फक्त ऑटो जनरेटेड प्रतिक्रियांशिवाय मला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही. त्यामुळे मला माझं एक्स अकाउंट डिलीटही करता येत नाहीये. कारण मी लॉगिन करु शकत नाही. "

पुढे श्रेया घोषालने चाहत्यांना म्हणाली, "कृपया अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका शिवाय त्यासंदर्भात आलेल्या कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. या सर्व स्पॅम आणि फिशिंग लिंक आहेत. माझं अकाउंट पुर्नप्राप्त झाल्यास मी तुम्हाला याबाबत अपडेट देईन." असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. 

श्रेयाने २००० मध्ये बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून पाऊल ठेवलं. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' या चित्रपटात तिला पहिल्यांदा गायनाची संधी मिळाली.आतापर्यंत श्रेयाने एक हजाराहून अधिक बॉलिवूड गाणी गायली आहेत. यामध्ये 'डोला रे डोला', 'सिलसिला ये चाहत का', 'चिकनी चमेली', 'तेरी मेरी', 'तेरे लिए' यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :श्रेया घोषालबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया