Join us
Daily Top 2Weekly Top 5

"फॅट बर्नरची अर्धी बॉटल संपवली आणि...", बॉडी शेमिंग अन् ट्रोलिंगमुळे गायिकेने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, नेमकं काय घडलेलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:54 IST

"तू जाड आहेस...", इंडस्ट्रीतील वरिष्ठाकडून गायिकेला मिळालेली अपमानास्पद वागणूक, ट्रोलिंगला कंटाळून घेतलेला टोकाचा निर्णय 

Neha Bhasin: बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगतात अनेकांना चांगले-वाईट अनुभव येतात. बरेचजण आपले अनुभव शेअर करतात अशाच एका लोकप्रिय गायिकेला तिच्या वजनावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ट्रोलिंगला कंटाळून तिने फॅट बर्नर खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही गायिका म्हणजे नेहा भसीन आहे. नेहा भसीन ही बॉलिवूडमधील आघाडीची गायिका आहे. अनेक सुपरहिट गाणी तिने गायली आहेत. परंतु, ही गायिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये नेहाने तिच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं. 

नुकतीच नेहा भसीनने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. साल २००२ मध्ये तिला फॅट बर्नरसाठी काही गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्या गोळ्यांचे साईड इफेक्टस माहित नसतानाही त्यावेळी तिने अनेक गोष्टी शेअर केल्या. त्यावेळी नेहा म्हणाली, "मी चॅनेलला सांगितलं की मला काहीतरी बोलायचं आहे. जो माणूस मला वारंवार त्रास द्यायचा तो देखील त्या मीटिंगमध्ये आला होता. त्यावेळी त्यांने कॉन्फरन्स रूममध्ये जो एक मोठा टीव्ही असतो, त्या टीव्हीवर माझा व्हिडिओ सुरू केला आणि माझ्या पोटावर वर्तुळ करत म्हणाला की, 'बघ तू जाड आहेस. हेच कारण आहे की, आम्ही हा व्हिडिओ रीलीज करत नाही."

त्यानंतर नेहा म्हणाली, "तोच राग डोक्यात घेऊन मी घरी परतले आणि फॅट बर्नरची निम्मी बॉटल रिकामी केली. मी स्वत: चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. पण, याबद्दल माझ्या बॅण्डमधील कोणालाच कल्पना नव्हती." असा धक्कादायक खुलासा नेहा भसीनने केला. 

वर्कफ्रंट

नेहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत आणि तिची बहुतेक गाणी सुपरहिट झाली आहेत. 'स्वॅग से स्वागत' हे गाणं खूप लोकप्रिय आहे. तसंच तिने 'कुछ खास', 'डंकी', 'असलम-ए-इश्कम' और 'जग घुमेया' अशा गाण्यांना आपल आवाज दिला आहे.

टॅग्स :नेहा भसीनबॉलिवूडसेलिब्रिटी