चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या नावावरून त्या चित्रपटाचा आधार काय असेल याची कल्पना येते. ही फार जुनी पद्धत आहे. शहरांच्या नावावर आधारित चित्रपट असतील तर ती त्या शहराची कथा असेल यात शंकाच नाही. मात्र असे नाव असलेल्या प्रत्येक चित्रपटातून तुमची इच्छा पूर्ण होईल याची शक्यता कमी आहे. १२ आॅगस्टला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित हृतिक रोशन व पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला मोहेंजोदडो हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोहेंजोदडोचा शब्दश: अर्थ मृतांची टेकडी असा होतो. ५००० वर्षांपूर्वीची नागरी संस्कृती दर्शविण्यासाठी निर्मात्यानी बरीच मेहनत केली असल्याचे चित्रपटाचा ट्रेलर पाहून दिसते. शहरांवर आधारित व त्या शहराची संस्कृती दाखविणारे बॉलिवूडमधील चित्रपटांची यादी सीएनएक्सच्या वाचकांसाठी...
शहरांच्या नावावर असलेले बॉलिवूडपट
By admin | Updated: August 1, 2016 02:37 IST