Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर सोनियाच्या भूमिकेत करीना दिसली असती! दिग्दर्शकाने सांगितला 'ऐतराज'मधील कास्टिंगचा किस्सा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:10 IST

"तिने चुकीचा निर्णय घेतला...", प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला 'ऐतराज'मधील करिनाच्या कास्टिंगचा किस्सा, म्हणाले...

Aitraaz Movie : अभिनेता अक्षय कुमार, प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर स्टारर ऐतराज हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला सर्वत्र दाद मिळाली. दरम्यान, ऐतराजमध्ये अक्षय कुमारने नायकाची तर करीना मुख्य नायिकेच्या भूमिका साकारली. तर  प्रियंकाने सोनिया नावाची नकारात्मक भूमिका साकारली होती. परंतु, सुरुवातीला सोनियाच्या भूमिकेसाठी करीनाला विचारण्यात करण्यात आली होती, पण तिने नकार दिला. प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. 

सुनील दर्शन यांनी 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'ऐतराज' चित्रपटाबद्दलचे किस्से शेअर केले आहेत. त्यावेळी ते म्हणाले, "बऱ्याचदा कलाकार चुकीचा निर्णय घेतात. त्यावेळेस नकारात्मक भूमिकांना कमी लेखलं जायचं. या चित्रपटात प्रियंकाला अमरीश पूरी यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे हा रोल शशिकला यांच्या भूमिकाप्रमाणे वाटला. मात्र, बदलत्या वेळेनुसारलोकांचा दृष्टिकोणही बदलत गेला. त्यानंतर मला असं वाटलं की ही भूमिका नाकारुन करिनाने मोठी चूक केली."

पुढे ते प्रियकांचं कौतुक करत म्हणाले, "त्यावेळी प्रियंका यशाच्या शिखरावर होती, तरीही तिने ही भूमिका साकारण्याचं आव्हान स्विकारलं. ती खूप मेहनती आहे. तिला जे पाहिजे त्यासाठी ती वाटेल तितकी मेहनत करुन ती गोष्ट मिळवते. ही भूमिका साकारून तिने सोनियाच्या भूमिकेला न्याय दिला."

दरम्यान, 'ऐतराज' या चित्रपटात अक्षय कुमार, करीना कपूर प्रियंका चोप्रासह अमरीश पुरी, अन्नू कपूर, परेश रावल, उपासना सिंह असे तगड्या कलाकारांची फौज आहे. ऐतराजमध्ये प्रियंका चोप्राने साकारलेल्या सोनियाच्या पात्राची सर्वांनीच प्रशंसा केली.

टॅग्स :बॉलिवूडअक्षय कुमारकरिना कपूरप्रियंका चोप्रासेलिब्रिटी