Join us

बॉलीवूडचे वाद न्यायालयात

By admin | Updated: March 28, 2016 03:59 IST

बॉलीवूडच्या काही स्टार्सचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत. काही स्टार्सना बॉलीवूडमध्ये कायद्याचे आवाहन मिळत आहेत, तर काही स्टार्सना बॉलीवूडच्या बाहेर कायद्याच्या नोटिसांचा

बॉलीवूडच्या काही स्टार्सचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत. काही स्टार्सना बॉलीवूडमध्ये कायद्याचे आवाहन मिळत आहेत, तर काही स्टार्सना बॉलीवूडच्या बाहेर कायद्याच्या नोटिसांचा सामना करावा लागत आहे. नुकतेच लग्न करणारी प्रीती झिंटाचा लेखक-निर्देशक अब्बास टायरवालासोबत वाद सुरू होता. या प्रकरणात न्यायालयाने प्रीतीच्या बाजूने निकाल दिला आहे. हा वाद निर्माता म्हणून प्रीतीचा चित्रपट ‘इश्क इन पेरिस’ या वरून होता, ज्याचे लेखन अब्बास टायरवालाने केले होते. अब्बासचा आरोप होता की प्रीतीच्या प्रोडक्शन कंपनीने ठरल्याप्रमाणे त्याला आतापर्यंत १८ लाखांचे पेमेंट दिले नाही. यावरून अब्बास न्यायालयात गेला. हे पहिलेच प्रकरण नाही की, बॉलीवूडचे दोन दिग्गजांचा वाद न्यायालयात गेला असेल. भूतकाळात असे कित्येक प्रकरण समोर आले आहेत. दिवंगत प्रकाश मेहरांच्या ‘जंजीर’ चित्रपटाचा जेव्हा रीमेक केला गेला त्यावेळी मूळ लेखकांची जोडी सलीम-जावेदने रॉयल्टीवरून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. ‘जंजीर’चे महानायक अमिताभ बच्चनचेही नाव अशा विवादांशी जोडले गेले आहे. जॅकी श्राफची पत्नी आयशा श्राफने जेव्हा ‘बूम’ चित्रपट (जो कॅटरिना कैफचा पहिला हिंदी चित्रपट होता) बनविला, तेव्हा या चित्रपटात काम करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना २५ लाखांचा चेक देण्यात आला. चेक बाउन्स झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी कोेर्टात केस टाकली. सर्वात मनोरंजक किस्सा राकेश रोशनद्वारा बनविण्यात आलेल्या ‘क्रेजी ४’ चित्रपटाचा होता. संगीतकार राम संपतने आपले संगीत चोरल्याच्या आरोपाखाली चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवसाअगोदर मुंबई हायकोर्टात अपील केले आणि राकेश रोशनला दोन कोटींचा फटका सहन करून कोर्टाच्या बाहेर राम संपतसोबत सेटलमेंट करावे लागले.

- anuj.alankar@lokmat.com