Join us  

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना करायची होती देशसेवा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 7:00 AM

बॉलिवूडचे काही स्टार्स इंडियन आर्मी जॉईन करु इच्छित होते, मात्र काही कारणास्तव त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली नाही, अशी त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

रवींद्र मोरे 

जम्मू काश्मिरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आतंकवादी हल्लयानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. देशाच्या तरुणाईमध्ये बदला घेण्याची तळमळ उफाळून निघत आहे. या भ्याड हल्लयात आपल्या देशाचे सुमारे ४२ जवान शहीद झाले आहेत. याने प्रत्येक ठिकाणी डोळ्यात अश्रू दिसत आहेत. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक घडवून या हल्लयाचा बदला घ्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. हा हल्ला उरी अटॅकपेक्षाही मोठा आहे. उरी अटॅकमध्ये २० जवान शहीद झाले होते. या संपूर्ण घटनेने बॉलिवूडमध्येही संतापाची लाट पसरली आहे. बॉलिवूडचे काही स्टार्स इंडियन आर्मी जॉईन करु इच्छित होते, मात्र काही कारणास्तव त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली नाही, अशी त्यांनी खंत व्यक्त केली आहे. जाणून घेऊया त्या स्टार्सबाबत... 

* शाहरुख खान

 

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने बºयाचदा मुलाखतीत हा खुलासा केला आहे की, त्याला इंडियन आर्मी जॉईन करायची होती. मात्र काही कारणास्तव तो आर्मीत जाऊ शकला नाही. शाहरुखने या इच्छेखातर सुरुवातीला आपल्या अभिनय करिअरमध्ये एका टीव्ही सिरीयलमध्ये एका आर्मीमॅनची भूमिकाही साकारली होती. यादरम्यान त्याचा दमदार अभिनय पाहून त्याला या शोमध्ये मुख्य भूमिका देण्यात आली होती. शाहरुखने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो आर्मी लढण्यासाठी नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी जॉईन करु इच्छितो.  

* अक्षय कुमार 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या फिटनेसने बॉलिवूडमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आपणास कदाचित माहित नसेल की, अक्षयचे वडील इंडियन आर्मीमध्ये होते आणि अशातच अक्षयचीही आर्मी जॉईन करण्याची इच्छा होती. मात्र अक्षयची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. तरीही देशसेवा म्हणून अक्षयने आॅनलाइन ‘भारत के वीर’ ही वेबसाइट सुरु केली आहे, ज्याद्वारे शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत दिली जाते.  

* सोनू सूद

साउथ चित्रपट इंडस्ट्रीद्वार बॉलिवूडमध्ये आपल्या जोरावार आगळावेगळा ठसा उमटविणारा दमदार अभिनेता सोनू सूदचेही आर्मी जॉईन करुन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते. मात्र त्याचे हे स्वप्न प्रत्येक्षात तर नव्हे पण जे पी दत्ताचा ‘पलटन’ चित्रपटाद्वारा एका सैनिकाची भूमिका करुन पूर्ण झाले. एका मुलाखतीत सोनूने सांगितले होते की, तो इंडियन आर्मी जॉईन करु इच्छित होता, मात्र त्याने त्याचे इंजिनियरिंगचे शिक्षण सुरु ठेवले आणि त्यातच चित्रपटसृष्टीकडे वळला. मात्र चित्रपटात सैनिक बनून त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले, असे तो म्हणाला.  

* नाना पाटेकर 

बॉलिवूडचा दमदार अभिनेता नाना पाटेकरांचे देश प्रेम अनेक चित्रपटातून दिसून आले आहे. विशेषत: प्रहार या सैनिकांवर आधारित चित्रपटाच्या वेळेस तर नानाने कमांडोची भूमिका रियल वाटण्यासाठी स्वत: सैनिकी ट्रेनिंग घेतले होते. एवढेच नव्हे तर ते तिथे एक स्टार म्हणून नव्हे तर एक सैनिक म्हणूनच वावरत होते. या वेळचे त्यांचे साहस आणि जोश पाहून नानाला ‘कॅप्टन’ पदवी देऊन सन्मानितही करण्यात आले होते. नानाने फक्त प्रहारच नव्हे तर कोहराममध्येही एका सैनिकाची भूमिका साकारुन देशसेवा दाखविली आहे. 

* निमरत कौर

 

या यादीत एकमेव अभिनेत्री निमरत कौरदेखील सहभागी आहे. निमरतला ‘एयरलिफ्ट’ द्वारा बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली होती. निमरत एका आर्मी कुटुंबाशी संबंधीत आहे आणि त्यामुळेच ती इंडियन आर्मी जॉईन करु इच्छित होती. मात्र तिने त्यावेळी असे जाहिर केले होते की, आर्मीमध्ये जाण्याची इच्छा तर आहे, मात्र ती त्यासाठी समर्थ नाहीय आणि त्यामुळेच तिने आपल्या अ ायुष्याचे ध्येय बदलून टाकले.   

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लानाना पाटेकरनिमरत कौरसोनू सूदअक्षय कुमार