Join us

दिलीप कुमार यांच्या भाचीसोबत घटस्फोट; नैराश्यात 'ती'नेही सोडली साथ! अभिनेत्याचा झालेला दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:31 IST

दिलीप कुमार यांच्या भाचीसोबत घटस्फोट; नैराश्याच्या वाटेवर'बॉलिवूड सुंदरी'ने सोडली साथ, शेवटी किडच्या आजाराने 'तो' हरला

Bollwood Actor: हिंदी चित्रपटसृष्टी ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी म्हणूनच ओळखली जाते. इथे ज्याची चलती असते त्यालाच सलाम ठोकला जातो. मात्र तुमचे नाव एकदा का मागे पडले की, तुमचा कार्यभाग संपला असं समजून जा.असा दुर्दैवाचा फेरा अनेक कलावंतांना भोगावा लागला आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे मजहर खान.'नाम अब्दुल है मेरा' या एकाच गाण्यातील प्रभावी छोट्या भूमिकेने  चित्रपटरसिकांच्या लक्षात राहिलेले अभिनेते मजहर खान वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. पण चुकीच्या निर्णयांनी त्यांनी आपली अभिनेता म्हणून ओळख तर गमावली.झीनत अमान सारख्या लोकप्रिय अभिनेत्रीशी झालेले लग्नही त्यांना टिकवता आलं नाही.

एक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून नावारुपाला आलेले मजहर खान यांचा २२ जुलै १९५५ रोजी दिल्लीत पठाण परिवारात जन्म झाला होता.1979 मध्ये प्रदर्शित ‘संपर्क’ या चित्रपटातून मजहर खान यांनी डेब्यू केला होता. त्यानंतर लगेचच आलेल्या 'शान' चित्रपटाची ऑफर मिळाली.या चित्रपटातील अब्दुलच्या भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धीची चव चाखायला मिळाली. मजहर यांनी 'आंधी-तूफान', 'गुलामी', 'शिवा का इंसाफ', 'बिंदिया चमकेंगी', 'धरम और कानून', 'एक ही भूल' अशा अनेक चित्रपटांत काम केले. मात्र, यानंतर चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी अनेक चित्रपट करूनही मजहर यांना म्हणावं तसं यश मिळत नव्हतं.यादरम्यान, त्यांनी अभिनेते दिलीप कुमार यांची भाची रुबिनासोबत निकाह केला.मात्र,लग्नानंतर त्यांच्यामध्ये खटके उडू लागले. संसार मोडल्यानंतर ते प्रचंड नैराश्यात गेले होते. 

बॉलिवूड सुंदरीसोबत दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ पण...

याचवेळी त्यांची भेट अभिनेत्री झीनत अमान यांच्यासोबत झाली.मजहर आणि झीनत एकमेकांच्या प्रेमात पडले.दोघांनीही लग्न केलं.झीनतच्या मदतीने चित्रपटसृष्टीतील आपलीही कारकिर्द बहरेल असे त्यांना वाटू लागले. मात्र दुर्दैवाने असे काहीही होऊ शकले नाही. पण लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांमध्येही वाद होऊ लागलेत.असंही सांगण्यात येतं की, मजहर झीनत यांना मारहाण करायचे. यानंतर झीनत आपल्या मुलाला घेऊन दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाल्या. मजहर खान यांना गोळ्यांचं व्यसन लागलं होतं.ते दिवसांतून सात वेळा पेन किलर गोळ्या घ्यायचे.याचा परिणाम त्यांच्या किडणीवर झाला. अखेरीस किडनीच्या आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली.१६ सप्टेंबर १९९८ ला वयाच्या ४३ व्या वर्षी मजहर खान यांचं निधन झालं.

टॅग्स :झीनत अमानबॉलिवूडसेलिब्रिटी