Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा मीडियावर निघाला तापसी पन्नूचा राग, लोक म्हणाले- "दुसरी जया बच्चन"! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 11:33 IST

सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान तापसी पन्नूने मीडियावर पुन्हा राग व्यक्त केला. असं काय घडलं की तापसीचा संताप झाला अनावर (taapsee pannu)

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तापसीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. तापसीचे सिनेमे म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची पर्वणी असते. तापसी एका कारणामुळे हल्ली सारखी चर्चेत असते. ते म्हणजे तिचा मीडियावरील राग. गेल्या काही दिवसात असे प्रसंग घडलेत की तापसीने पापाराझींवर राग काढला. पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. त्यामुळे लोक तापसीलाच ट्रोल करत आहेत. 

तापसी पन्नूचा पुन्हा मीडियावर राग

काल मुंबईत 'फिर आयी हसीन दिलरुबा' सिनेमाचा प्रीमियर झाला. या प्रीमियर सोहळ्याला सिनेमातले सर्व प्रमुख कलाकार उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री तापसी पन्नूसुद्धा उपस्थित होती. मीडियाला समोर पाहताच तापसी पन्नूचा राग अनावर झाला. मीडिया तापसीचे फोटो - व्हिडीओ काढण्यासाठी पुढे आले. तेव्हा तापसी त्यांना म्हणाली, "तुम्ही माझ्यावर चढू नका,  तुम्ही मला घाबरवत आहात." पुढे वैतागून तापसी पुढे जायला निघाली. "मॅडमला सॉरी म्हणा", असं मीडियामधून कोणीतरी म्हणालं.

लोकांनी तापसीलाच केलं ट्रोल

तापसीचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओखाली कमेंटकडे नजर गेल्यास अनेक लोकांनी तापसीला दुसरी जया बच्चन असं म्हटलं आहे. तापसी अनेकदा मीडिया आणि पापाराझींवर रागावताना दिसते. इतकंच नव्हे ती कधीही मीडियाशी धड संवाद साधत नाही. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन सुद्धा अशीच संतापजनक वागणूक मीडियाला देतात. याच कारणाने लोकांनी तापसीला "दुसरी जया बच्चन" म्हटलं आहे. तापसीचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' सिनेमा आज रिलीज होणार आहे. 

टॅग्स :तापसी पन्नूमाध्यमेबॉलिवूड