Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha kapoor ) हे बॉलिवूड इंडस्ट्रतील लोकप्रिय असं नाव आहे. बऱ्याचदा श्रद्धा तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री लग्न कधी करणार? हे जाणून घेण्यासाठी श्रद्धाचे चाहते कायमच उत्सुक असतात. अलिकडेच श्रद्धा कपूरचं नाव राहुल मोदीसोबत जोडलं गेलं आणि तिच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा होऊ लागली. परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाल्याची माहिती देखील समोर आली होती. आता श्रद्धा आणि राहुल पुन्हा एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरीच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड राहुलसोबत ट्विनिंग केल्याची पाहायला मिळते आहे. दोघांचाही चेहरा न दाखवता त्यांचे पाय दिसतील असा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय फोटो सोबतच श्रद्धाने हार्ट इमोजी देत राहुलला टॅग देखील केलं आहे. त्यामुळे श्रद्धा आणि राहुलच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, २०१४ पासून श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्याचबरोबर अनेक इव्हेंट्समध्ये ते दोघं एकत्र स्पॉट झालेत. गेल्या वर्षी श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा 'तू झूठी मै मक्कार' सिनेमा आला होता. या सिनेमाचा लेखक होता राहुल मोदी. श्रद्धा आणि राहुल एकमेकांना डेट करायला लागले. अंबानींच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये श्रद्धा त्याच्यासोबत दिसली होती.आता श्रद्धा तिचं हे नातं कधी अधिकृत करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.