Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री मलायका अरोराची नवी इनिंग! लाडक्या लेकाला सोबत घेऊन सुरू केला 'हा' व्यवसाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:48 IST

मलायका अरोराने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Malaika Arora : आपल्या नृत्याने आणि घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा( Malaika Arora). मलायका अरोरा ही बी-टाऊनमधील (Bollywood) एक लोकप्रिय नायिका आहे. परंतु सिनेसृष्टीत अभिनेत्री तिच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं गेलं. परंतु काही मतभेदांमुळे मलायका-अर्जुनचा ब्रेकपअप झाला. पण, अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर स्वत: ला सावरत मलायकाने नवी इनिंग सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, मलायकाला तिच्या आयुष्यात एका व्यक्तीचा मोठा आधार लाभला आहे. ती व्यक्ती म्हणजे तिचा मुलगा आहे. तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये तिचा लाडका लेक खंबीरपणे पाठीशी उभा असतो. याचा प्रत्यय अनेकदा आलाय. अशातच या माय-लेकाच्या जोडीने व्यवसाय क्षेत्रात आपलं नशीब अजमावण्याचं ठरवलं आहे. मलायकाने तिचा मुलगा अरहानला सोबत घेऊन एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. 

सोशल मीडियावर मलायकाने पोस्ट शेअर करत चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे."Collaborating for the first time" असं कॅप्शन मलायकाने या फोटोंना दिलं आहे. अभिनेत्रीने अरहानसोबत मिळून मुंबईत नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ‘स्कार्लेट हाउस’ असं त्यांच्या या नव्या रेस्टॉरंटचं नाव आहे. मलायकाचं हे नवीन रेस्टॉरंट विशिष्ट पद्धतीने डिझाईन केलेलं आहे. विशेष म्हणजे बांद्रा येथील ९० वर्ष जुन्या पोर्तुगीज इमारतीत हे रेस्टॉरंट स्थित आहे.

सोशल मीडियावर मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून  या रेस्टॉरंटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. मलायकाच्या या निर्णयाचं कौतुक करत तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियामुंबई