Sunjay Kapoor Death: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर यांचं निधन झालं आहे. ५३व्या वर्षी त्यांनी इंग्लंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. पोलो गेम खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यानंतर त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
करिश्मा कपूरने बिजनेसमॅन संजय कपूर यांच्याशी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यामुळे २०१४ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले होते. करिश्माने त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक हिंसाचाराचे आरोपही लावली होते. त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत.
संजय कपूर हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते. त्यांना पोलो गेम खेळण्याची आवड होती. मात्र, आपला आवडता खेळ खेळतानाच त्यांना मृत्यूने गाठलं. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं. त्यांच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही ऑफिशियल माहिती देण्यात आलेली नाही.