Join us

बॉलीवूड अभिनेत्रींची फजिती

By admin | Updated: October 20, 2016 02:21 IST

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एक पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलीवूडमधील कलाकारांनी चार चाँद लावले,

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एक पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलीवूडमधील कलाकारांनी चार चाँद लावले, पण या पुरस्कार सोहळ्यात लक्ष वेधून घेतले, ते काजोलच्या बेज अँड ब्लॅक ड्रेसने. बॉलीवूडची ही अभिनेत्री तिने परिधान केलेल्या आउटफिटमध्ये बऱ्याचदा अडखळताना दिसली. त्यामुळे संपूर्ण पुरस्कार सोहळयात तिची चांगलीच फजिती झाली. अशाच काही ड्रेसेसमुळे फजिती झालेल्या बॉलीवूड अभिनेत्रींचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला आढावा.>वाणी कपूरबेफिक्रे या आगामी चित्रपटामुळे वाणी कपूर ही बरीच चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत झळकणार आहे, पण या अभिनेत्रीलादेखील तिच्या ड्रेसने धोका दिला. एका पुरस्कार सोहळ््याच्या वेळी तिच्या आउटफिटचा गळा खूपच खाली आला होता. शेवटी तिला आपल्या ड्रेसचा हा निसटता गळा सांभाळावा लागला.>श्रद्धा कपूरआपल्या प्रत्येक स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिलाही ड्रेसने धोका दिला. भर प्रेक्षकांसमोरच तिला आपला ड्रेस सांभाळावा लागला होता. हा प्रकार तिच्यासोबत दोनदा घडला आहे. सध्या तिचा हाफ गर्लफ्रेंड हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, तसेच या चित्रपटाची तरुणांमध्येदेखील अधिक उत्सुकता दिसतेय.>प्रियांका चोप्रा बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही प्रियांका चोप्राने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. मराठीमध्येही ती पदार्पण करण्यास सज्ज झालीय. अशा या सुंदर अभिनेत्रीला एकदाच नाही तर तब्बल दोन वेळा अशा त्रासाला सामोरे जावे लागले. एका कार्यक्रमावेळी ही अभिनेत्री आपले स्लिव्हज सांभाळाताना कॅमेऱ्यात कैद झाली.>करीना कपूरबॉलीवूडची ही तगडी अभिनेत्री सध्या प्रेग्नन्सीमुळे बरीच चर्चेत आहे. आपल्या सुंदर स्टाईलने प्रेग्नन्सीदेखील गाजविते आहे. करीना सातत्याने गर्भावस्थेतही सोशल मीडियावर अधिक ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय, पण तिलाही आपला जलवा दाखविताना त्रास सहन करावा लागला. एका पत्रकार परिषदेत करीनाला आपले स्लिव्हज सांभाळावे लागले होते. संपूर्र्ण पत्रकार परिषदेत ती त्रस्त झालेली पाहायला मिळाली.