Varun Dhawan: ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आणि मुंबईतील अंडरवर्ल्ड यांचे संबंध सर्वश्रुत आहेत.. त्या काळात अनेक निर्माते आणि कलाकारांना खंडणीसाठी धमकीचे फोन येत असल्याच्या घटना समोर आल्या. त्या काळात अंडरवर्ल्डचं बॉलिवूड इंडस्ट्रीवर नियंत्रण होतं. बऱ्याच कलाकारांनी यावर अगदी खुलेपणाने भाष्य केलं आहे. अलिकडेच लोकप्रिय अभिनेता वरुण धवनने त्या काळातील अनुभव शेअर केले.
'युवा' (Yuva) या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत वरुण धवनने त्या प्रसंगावर भाष्य केलं. त्याच्या कुटुंबालाही अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत होत्या, ज्यामुळे त्यांना रातोरात राहतं घर सोडावं लागलं होतं. त्या वेळी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना अंडरवर्ल्डमधून फोन येत होते, असं त्याने सांगितलं. दरम्यान,वरुण म्हणाला, " त्यावेळी आम्हालाही असे फोन यायचे. बरेच दिवस हे असं सुरु होतं. पण, सुरुवातीला आम्हाला याची अजिबात कल्पना नव्हती; कारण फोन करणाऱ्या व्यक्तीशी वाद घालण्याचे काम आमचे स्टाफच करत होते. त्या स्टाफने तर आमचा घराचा पत्ताही दिला होता गार्डनमध्ये येऊन मला भेट असं त्याने म्हटलं होतं.तसंच अगदी मारहाणाची भाषा देखील वापरली होती."
वरुणने यापुढे खुलासा केला की, जेव्हा परिस्थिती अधिकच बिघडली, तेव्हा एका अभिनेत्याने त्याचे वडील डेव्हिड धवन यांना फोन कॉल्स केले. "त्यांनी सांगितलं की, हे प्रकरण आता हाताबाहेर जात आहे. समोरचा व्यक्ती थेट बंदूक घेऊन तिथे येण्याची धमकी देत होता. त्याला आमच्या घरचा पत्ता आणि ऑफिसच्या वेळा देखील माहित झाल्या होत्या. जेव्हा बाबांनी विचारलं की ही माहिती कोणी उघड केली, तेव्हा त्याने आमच्या स्टाफपैकी एकाचे नाव घेतले. त्यामुळे, आम्हाला त्या वेळेस आमचं राहतं घर सोडून दुसरीकडे राहावे लागलं."
वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तो सनी देओलच्या बॉर्डर 2 या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने जगभरात 450 कोटी रुपयांची कमाई केली. लवकरच तो 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये दिसणार आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पूजा हेगडे, मृणाल ठाकूर जिमी शेरगिल आणि मौनी रॉय आणि रोहित हे कलाकार देखील आहेत.
Web Summary : Varun Dhawan disclosed his family received underworld threats, forcing a sudden home relocation. Staff inadvertently shared information, escalating the danger, leading to a protective move after a fellow actor intervened.
Web Summary : वरुण धवन ने खुलासा किया कि अंडरवर्ल्ड की धमकी के कारण उनके परिवार को रातोंरात घर छोड़ना पड़ा। कर्मचारियों ने अनजाने में जानकारी साझा की, जिससे खतरा बढ़ गया, जिसके बाद एक साथी अभिनेता के हस्तक्षेप के बाद सुरक्षात्मक कदम उठाया गया।