Join us  

'बॉलिवूड सडलेला..,नशेमध्ये धुंद असलेले सगळीकडेच'; ड्रग्स प्रकरणावर सनी देओलचं थेट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 10:50 AM

Sunny deol: यापूर्वी सुद्धा सनी देओलने ड्रग्ससारख्या विषयावर भाष्य केलं आहे.  

बॉलिवूड आणि ड्रग्स प्रकरण यांचा एकमेकांशी बऱ्याचदा संबंध जोडला जातो. काही ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची नाव समोर आली आहेत. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स प्रकरण हा मुद्दा कायम चर्चिला जातो. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक कलाकारांचं नाव ड्रग्स प्रकरणी जोडलं गेलं होतं. त्यानंतर अभिनेता सनी देओल (Sunny deol) याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे.

सनी देओलची मुख्य भूमिका असलेला गदर २ हा सिनेमा येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं सध्या तो जोरदार प्रमोशन करत आहे. अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूड आणि ड्रग्स याविषयावर मोकळेपणाने व्यक्त झाला.

"बॉलिवूड सडलेला नाही तर माणूस सडलेला आहे. ते कोणत्या क्षेत्रात नाहीयेत हे मला सांगा. बिझनेसमन असेल, स्पोर्ट्समन असेल. ड्रग्सच्या नशेमध्ये धुंद असलेले लोक सगळीकडेच दिसतात. पण, आम्ही ग्लॅमरसवाले आहोत ना त्यामुळे आमच्यावर टीका करायला लोकांना मजा येते", असं सनी देओल म्हणाला.

दरम्यान, यापूर्वी सुद्धा सनी देओलने ड्रग्ससारख्या विषयावर भाष्य केलं आहे.  'मी आयुष्यभर दारु, ड्रग्स आणि पार्टी' या तीन गोष्टींपासून लांब राहिलो, असं तो म्हणाला होता. सध्या सनी त्याच्या गदर २ मुळे चर्चेत आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा या सिनेमाचा सिक्वल येत आहे.

टॅग्स :सनी देओलसेलिब्रिटीबॉलिवूडअमली पदार्थशाहरुख खानआर्यन खान