Join us

सैफ अली खानवर चाकूनं हल्ला; करीना कुठे होती? इन्स्टा स्टोरीतून मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:34 IST

अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, लीलावती रुग्णालयात दाखल.

Saif Ali khan Attacked: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या घटनेत सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली असून त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अज्ञात व्यक्तीसोबत झालेल्या झटापटीत अभिनेत्याच्या मानेला आणि मनक्याला दुखापत झाल्याचं कळतंय. या घटनेमुळे सैफचे चाहते देखील चिंतेत आहेत. 

दरम्यान, ही घटना घडली तेव्हा सैफची पत्नी म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान कुठे होती? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. परंतु या घटनेच्या रात्री करीना आपल्या गर्ल्स गॅंगसोबत पार्टीमध्ये असल्याचं सांगितलं जातंय. करीना त्या रात्री बहीण करिष्मा कपूर आणि सोनम कपूर, रिया कपूर यांच्यासोबत गर्ल नाईट एन्जॉय करत  असल्याची माहिती मिळतेय. शिवाय ही घटना घडण्याच्या काही वेळापूर्वीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. परंतु करीना कपूरने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सैफ अली खानवर झालेल्या या हल्ल्यामुळे खान कुटुंबीय चिंतेत आहेत. 

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात माणूस सैफ अली खानच्या घरात घुसला. त्या माणसाने अभिनेत्याच्या मोलकरशी वाद घातला. परंतु जेव्हा सैफ त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न  करत होता त्याचक्षणी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत अभिनेता गंभीर जखमी झाला आहे. शिवाय मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरबॉलिवूडमुंबईपोलिस