अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Preitik Babbar) या महिन्यात लग्न करत आहे. याआधी प्रतीकचा घटस्फोट झाला आहे. आता तो गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत (Priya Banerjee) लग्नगाठ बांधणार आहे. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात हे कपल लग्न करत आहे. प्रतीक आणि प्रिया बॅनर्जी अनेकदा एकमेकांसोबत रोमँटिक फोटो पोस्ट करत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी आपलं नातं जाहीर केलं होतं.
फेब्रुवारी महिना सुरु होताच सगळे व्हॅलेंटाईन डेची वाट पाहतात. प्रतीक आणि प्रियाने लग्नासाठी व्हॅलेंटाईन डेचा मुहुर्त साधला आहे. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, प्रतीक आणि प्रिया १४ फेब्रुवारी रोजी मुंबईतील घरीच लग्न करणार आहेत. ही इंटिमेट वेडिंग सेरेमनी असणार आहे. मोजकेच लोक यामध्ये सहभागी होणार आहेत. दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार असणार आहे.
प्रतीक बब्बरने २०२३ मध्ये प्रिया बॅनर्जीला प्रपोज केलं होतं. त्यांनी एंगेजमेंट केली. याआधी प्रतीक सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकला होता. मात्र ४ वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. प्रिया बॅनर्जी ही कॅनेडियन अभिनेत्री आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने काही वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.