Arjun Kapoor:अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यापैंकी एक आहे. 'इशकजादे' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवून त्याने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आतापर्यंत अर्जुन कपूरने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. लवकरच तो 'मेरे हसबंड की बिवी' या त्याच्या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे. अशातच अभिनेत्याने नुकतीच त्याची दिवंगत आई मोना शौरी यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता अर्जुन कपूरची दिवंगत आई आणि बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना शौरी यांचा आज जन्मदिवस आहे. यानिमित्ताने अर्जुन कपूरने आपल्या आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट लिहिली आहे. अर्जुन कपूरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. या पोस्टमध्ये अर्जुन कपूरने लिहिलंय की, "हॅप्पी बर्थडे आई..., मला तुझी नेहमीच आठवण येते, कदाचित आता पूर्वीपेक्षा जास्त. तू आम्हाला शिकवलेली प्रत्येक गोष्ट आत्मसात करुन त्यामार्गावर आम्ही चालत आहोत, नक्कीच तुला आमचा अभिमान असेल."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "आम्ही चांगले प्रयत्न करत आहोत आणि तुझं नाव उज्वल करतोय. मी तुझ्या फोटोपासून लांब जात आहे कारण माझ्याकडे शब्दही संपले आहेत. मला याचा तिरस्कार वाटतोय की मी आता काही बोलू शकत नाही पण एक दिवस आपण पुन्हा भेटू, पुन्हा मिठी मारू, पुन्हा बोलू तोपर्यंत हसत रहा. आमच्याकडे पाहत रहा, खूप खूप प्रेम...! अशी भावुक करणारी पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे."
अर्जुन हा बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा मुलगा आहे. बोनी कपूर यांनी १९८३ साली मोना कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर १६ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. मोना कपूर यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरा विवाह केला होता. दरम्यान, २५ मार्च २०१२ रोजी अर्जुनची आई आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची पत्नी मोना कपूर यांचं निधन झालं.